Investment Tips : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केट तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा मिळतोय. पण गेल्या काही वर्षात शेअर मार्केट पेक्षा सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक रिटर्न मिळाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काळात सोन्याच्या किमती आणखी वाढणार असा अंदाज आहे.
येत्या आठ नऊ दिवसांनी म्हणजेच दिवाळीत सोन्याच्या किमती जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचणार आहेत. इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी दिवाळीत सोन्याच्या किमती किती वाढू शकतात याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

त्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत दिवाळीत सोन्याच्या किमती आणखी वाढणार असल्याचे सांगितले आहे. खरे तर यावर्षी पहिल्यांदाच सोन्याच्या किमती एक लाख रुपये प्रति तोळा झाल्या आहेत. एप्रिलमध्ये सगळ्यात आधी सोन्याची किंमत एका लाखाच्यावर गेली होती.
दरम्यान, काल बुधवारी सोन्याची किंमत एक लाख 27 हजार रुपये प्रति तोळा होती. जीएसटी व मेकिंग चार्जेस पकडून किंमत एक लाख 40 हजार 810 झाली होती. अशातच आता तज्ञांनी दिवाळीत म्हणजेच येत्या आठ-नऊ दिवसांनी किमतीत आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज दिला आहे.
सोन्याच्या किमती प्रति तोळा मागे दहा हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीत सोन्याची किंमत जीएसटी व मेकिंग चार्जेस पकडून एक लाख 45 हजार रुपये प्रति तोळापर्यंत पोहोचतील असा अंदाज इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स कडून वर्तवण्यात आला आहे.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भूराजकीय तणावामुळे या मौल्यवान धातूच्या किमती येत्या काळात सुद्धा वाढत राहणार आहेत. आता आपण सोन्याच्या किमती का वाढत आहेत याबाबत माहिती पाहूयात.
किमतीत वाढ होण्याचे कारण
रशिया – युक्रेन युद्ध
अमेरिकन फेडरल बँकेने कमी केलेले व्याजदर
अनेक देशांच्या सेंट्रल बँकांनी मोठ्या प्रमाणात सुरू केलेली सोने खरेदी
जागतिक पातळीत सोन्यात वाढणारी गुंतवणूक
इस्रायल-गाझा तणाव