Investment Tips : आज गोवत्स द्वादशी आणि आज पासून दीपोत्सवाला सुरुवात झाली आहे. खरे तर दिवाळीत सोन्या आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक जण सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करतात.
दरम्यान जर तुमचाही उद्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. सोने हे गुंतवणुकीचे एक प्रमुख साधन आहे.

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती खूपच वाढल्या आहेत. दररोज सोन्याच्या किमती नवनवीन रेकॉर्ड तयार करतायेत. यामुळे आता सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की काही काळ वाट पहावी असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या माध्यमातून उपस्थित होतोय.
सोन्याच्या किंमती कशा आहेत ?
शुद्धता | किंमत |
24 कॅरेट | एक लाख 32 हजार 770 रुपये प्रति तोळा |
22 कॅरेट | एक लाख 21 हजार 700 रुपये प्रति तोळा |
18 कॅरेट | 99 हजार 580 रुपये प्रति तोळा |
10 दिवसांत सोन्याच्या किमतीत प्रति तोळ्यामागे 8 हजार 840 रुपयांची वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदार हा काळ सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे की नाही? असा प्रश्न विचारताना दिसतात. दरम्यान आज आपण याच संदर्भात तज्ञांचे म्हणणे काय आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.
ऑगमोंट येथील संशोधन प्रमुख रेनिशा चैनानी यांनी नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांना काही काळ वाट पाहावी असा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते सोन्याच्या तेजीचे कारण सध्या अनिश्चित परिस्थिती, व्याजदर कपातीची अपेक्षा आणि मध्यवर्ती बँकेची जोरदार खरेदी आहे.
पण, जवळच्या काळात काही नफा बुकिंग दिसून येऊ शकते, कारण सध्या किमती रेकॉर्ड हायवर आहेत. चैनानी यांच्या मते, जर तुम्ही आधीच चांगली गुंतवणूक केली असेल, तर अंशतः नफा घेणे चांगले राहणार आहे. अर्थात ज्यांची सोन्यामध्ये आधीच गुंतवणूक असेल त्यांनी प्रॉफिट बुक करायला काय हरकत नाही.
तसेच नवीन गुंतवणूकदारांनी उच्च किमतींवर नव्हे तर घसरणीवर खरेदी करावी. अर्थात सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यानंतरच नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांनी खरेदी करायला हवी असा सल्ला त्यांनी दिला आहे.