Investment Tricks:- केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटी दरामध्ये सुधारणा करण्यात आली व या सुधारणेमुळे साबण तसेच टूथपेस्ट, अन्न प्रक्रिया उत्पादने, शैक्षणिक साहित्य, आरोग्य विमा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर 12 टक्के किंवा अठरा टक्क्यांवरून थेट पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलेला आहे व यामुळे साहजिकच मध्यमवर्ग कुटुंबाच्या मासिक खर्चामध्ये काहीशी बचत होण्याची शक्यता आहे. जर आपण या बाबतीत फायनान्स रिसर्चचे विश्लेषण बघितले तर जीएसटी दरातील सुधारणांमुळे घरगुती उत्पन्नात वाढ होणे व लोकांकडे अधिक खर्च करण्यासाठी रक्कम उपलब्ध होईल. ही जी काही रक्कम वाचेल ती दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून वापरली तर फायदा होऊ शकतो. ही वाचलेली रक्कम जर एसआयपी आणि एसडब्ल्यूपी सारख्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक केली तर जास्तीचा फायदा मिळू शकतो.
कुठे कराल गुंतवणूक?
आपल्याला माहित आहे की एसआयपीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकतात. यात गुंतवणूक केली तर तुम्ही दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू शकतात. कमी झालेल्या जीएसटीमुळे जर तुम्ही पाचशे ते दीड हजार रुपये दरमहा तुमचे वाचले व ही रक्कम जर तुम्ही एसआयपी साठी वापरली तर सुरुवातीसाठी ती पुरेशी ठरू शकते. यामुळे तुमच्यात एक आर्थिक शिस्त तर निर्माण होईलच आणि बाजारातील चढउतारांवर आधारित सरासरी परतावा देखील तुम्हाला मिळण्यास मदत होईल. इतक्याच नाहीतर एसडब्ल्यूपी या पर्यायाच्या माध्यमातून निवृत्ती व्यक्ती किंवा नियमित उत्पन्न हवे असणारे गुंतवणूकदार प्रत्येक महिन्याला निधी काढू शकतात. जीएसटी मुळे खर्च कमी झाल्यामुळे पूर्वी जेवढी रक्कम मासिक खर्चासाठी लागायची ती आता कमी लागणार आणि उरलेली रक्कम एसडब्ल्यूपीसाठी देखील वापरता येणार आहे.

प्रत्येक महिन्याला एसआयपीत एक हजार गुंतवले तर…
सरकारने केलेल्या या जीएसटी बदलामुळे अनेक महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्यास मदत झालेली आहे व यामुळे जर तुमच्या महिन्याच्या बजेटमधून एक हजार रुपये वाचले व हे वाचलेले 1000 रुपये दर महिन्याला एसआयपीमध्ये दहा वर्षांकरिता गुंतवायला सुरुवात केली तर तुमचे एकूण एक लाख वीस हजार रुपये जमा होतात व 12 टक्के सरासरी वार्षिक परताव्याने तुम्हाला दहा वर्षानंतर दोन लाख 32 हजार रुपये या माध्यमातून मिळतील.