Investmnet Schemes : ‘या’ ठिकाणी मिळत आहे सर्वाधिक व्याज, 100 रुपयांच्या गुंतवणुकीतून होईल बंपर कमाई; अशी करा सुरुवात

Published on -

Investmnet Schemes : देशामध्ये अशा अनेक सरकारी बचत योजना आहेत ज्या तुम्हाला बचतीसोबत चांगले पैसे कमविण्याची संधी देत आहेत. त्याशिवाय सुरक्षित आणि निश्चित परताव्यासाठी अनेकजण बँक एफडीचा पर्याय निवडत आहेत. तुमच्यासाठी चांगल्या परताव्यासाठी इतर पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्हाला बँक एफडीमधून जबरदस्त परतावा देतात.

चांगली गोष्ट म्हणजे या सरकारी योजना असल्याने त्यांच्या सुरक्षेची खात्री मिळते आणि कर सवलत मिळत आहे. हे लक्षात घ्या की इंडिया पोस्ट हा एक सरकारी उपक्रम असून ज्या माध्यमातून गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या बचत आणि गुंतवणूक पर्याय उपलब्ध होतात.

तसेच गुंतवणुकदारांना चांगल्या परताव्यासह सुरक्षेची हमी दिली जाते. SBI ही ग्राहकांना चांगले व्याज देत आहे. त्यामुळे अनेकांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करावी की SBI मध्ये गुंतवणूक करावी, असा प्रश्न पडतो. जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर.

जाणून घ्या SBI चे RD वर मिळणारे व्याज दर

SBI कडून एक ते 10 वर्षांपर्यंतची आरडी योजना जारी करण्यात आली आहे. या योजनेत एखादी व्यक्ती प्रत्येक महिन्याला फक्त 100 रुपये गुंतवण्यास सुरुवात करू शकते. तसेच तुम्ही ही गुंतवणूक 10 च्या पटीत वाढवू शकता. हे लक्षात घ्या की SBI सामान्य लोकांना 6.50 ते 7 टक्के आणि वृद्धांना 7 टक्के ते 7.50 टक्के इतके व्याज देत आहे.

जाणून घ्या पोस्ट ऑफिसवर मिळणारे व्याज दर

हे समजून घ्या की पोस्ट ऑफिस आरडी योजना 5 वर्षांच्या मॅच्युरिटीसह येत आहेत. या योजनेत एखादी व्यक्ती प्रत्येक महिन्याला फक्त 100 रुपये गुंतवण्यास सुरुवात करू शकते. त्यानंतर तुम्ही ही गुंतवणूक 10 च्या पटीत वाढवू शकता.

हे लक्षात घ्या की पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये वृद्धांना जास्तीचे व्याजदर देण्यात येत नाही. पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये ६.५ टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये मिळणाऱ्या व्याजावर 10% टीडीएस येतो. तसेच ज्यावेळी RD वर 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज असेल त्यावेळी हे लागू होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News