गुंतवणूकदारांमध्ये धुमाकूळ! ‘या’ आयपीओने बाजारात केली खळबळ… संधी चुकवू नका

Published on -

Influx Healthtech IPO:- आज शेअर बाजारात एक उत्साहजनक घडामोड घडली व ती म्हणजे इन्फ्लक्स हेल्थटेक या हेल्थटेक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा IPO आज, २० जून रोजी बंद होत आहे, आणि या शेअरबाजारात नव्याने एन्ट्री घेणाऱ्या कंपनीला गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. केवळ दोन दिवसांतच या IPO ला २५ पट अधिक मागणी मिळाली आहे, आणि त्यामुळे शेवटच्या दिवशीसुद्धा गुंतवणूकदारांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

इन्फ्लक्स हेल्थटेकचा IPO ३६ पट झाला सबस्क्राईब

इन्फ्लक्स हेल्थटेकचा हा IPO १८ जूनला खुला झाला आणि पहिल्याच दिवसापासून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग इथे प्रचंड मोठा असून, ‘रिटेल’ कॅटेगरीत हा IPO तब्बल ३६ पट भरला गेला आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांचाही सहभाग राहिलेला असून, ‘क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स’मध्ये १.६९ पट आणि ‘एनआयआय’ म्हणजेच नॉन-इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीमध्ये ३२ पटांहून अधिक मागणी दिसून आली.

या आयपीओची लॉट साइज किती?

या IPO साठी दर शेअर किंमत ९६ रुपये ठरवण्यात आली असून, गुंतवणुकीचा किमान लॉट १२०० शेअर्सचा आहे. म्हणजेच, किमान गुंतवणूक १,१५,२०० रुपयांची आहे. त्यामुळे हे SME सेगमेंटमधील असूनही तुलनात्मकदृष्ट्या मोठ्या गुंतवणुकीची गरज असलेला IPO आहे. मात्र तरीही, मागणीचा जो जोर आहे, तो पाहता गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास या कंपनीबाबत स्पष्टपणे जाणवतो.

इन्फ्लक्स हेल्थटेकने १७ जून रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून १६.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक उभारली होती. IPO चा एकूण आकार ५५.६३ कोटी रुपये असून, यामध्ये ४६.९४ लाख नवीन शेअर्स आणि ११ लाख शेअर्स ‘ऑफर फॉर सेल’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जात आहेत. कंपनीची लिस्टिंग येत्या २५ जून रोजी NSE-SME प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

या आयपीओची ग्रे मार्केटमधील स्थिती काय?

गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेणारा आणखी एक मुद्दा म्हणजे ग्रे मार्केटमधील हालचाल. इन्व्हेस्टर्सगेनच्या माहितीनुसार, या IPO ला ३८ रुपये प्रति शेअर असा प्रीमियम मिळत आहे. म्हणजेच, लिस्टिंगप्रसंगी ३९ टक्क्यांपर्यंतचा फायदा मिळण्याची शक्यता गुंतवणूकदारांमध्ये वर्तवली जात आहे. IPO उघडल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १७ जून रोजी याच IPO चा GMP ४५ रुपयांपर्यंत पोहोचला होता. सध्या तो थोडा खाली आला असला तरी २० रुपयांच्या नीचांकी स्तरावरून तो सध्या चांगलाच मजबूत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!