Stock Market : मुकेश अंबानी यांच्या अनेक कंपन्या आहेत ज्या बाजारात सूचीबद्ध आहेत परंतु शेअरची किंमत 30 रुपयांपेक्षा कमी आहे. अशीच एक कंपनी म्हणजे हॅथवे केबल आणि डेटाकॉम. आता या केबल टीव्ही आणि फायबर इंटरनेट प्रदाता कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालानंतर गुरुवारी हॅथवे केबल आणि डेटाकॉमच्या शेअर्सवर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात दाव लावताना दिसत आहेत.
गुरुवारी, आठवड्याच्या चौथ्या दिवशी, Hathway Cable & Datacom चे शेअर्स 7 टक्क्यांनी वाढून 22.84 वर पोहोचला आहे. व्यवहाराच्या शेवटी शेअरची किंमत 22.02 रुपये होती. एका दिवसाच्या आधीच्या तुलनेत स्टॉक 4.26 टक्के वर बंद झाला. 6 फेब्रुवारी 2024 रोजी या शेअरची किंमत 27.90 रुपये होती, जी 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
हॅथवे केबल आणि डेटाकॉमने मार्च तिमाहीत 34.57 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत 14.62 कोटी रुपयांचा तोटा झाला. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत ऑपरेशन्समधील महसूल वार्षिक 7.35 टक्के वाढून 493.37 कोटी रुपये झाला. या तिमाहीत एकूण खर्च वार्षिक 1.86 टक्के वाढून 493.52 रुपये झाला आहे.
या तिमाहीत केबल टेलिव्हिजन विभागातून कंपनीचा महसूल 330.62 कोटी होता, तर ब्रॉडबँड व्यवसाय 153.85 कोटी आणि सिक्युरिटीजमधील व्यवहारातून मिळणारा महसूल 8.90 कोटी होता. तुमच्या माहितीसाठी Hathway Cable & Datacom ही भारतातील सर्वात मोठी मल्टी-सिस्टम ऑपरेटर (MSO) आणि केबल ब्रॉडबँड सेवा प्रदाता आहे.
मार्च तिमाहीपर्यंतच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, हॅथवे केबल आणि डेटाकॉममध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी 75 टक्के होती. जर आपण सार्वजनिक शेअरहोल्डिंगबद्दल बोललो तर ते 25 टक्के आहे. हॅथवे केबल आणि डेटाकॉमच्या प्रवर्तकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे. यामध्ये जिओ कंटेंट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड, जिओ इंटरनेट डिस्ट्रिब्युशन होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि जिओ केबल आणि ब्रॉडबँड होल्डिंग यांचा समावेश आहे.