10 हजाराच्या गुंतवणुकीत गुंतवणूकदारांना मिळाले 16 कोटी ! कोणती आहे ‘ती’ योजना

Ahmednagarlive24 office
Published:

Mutual Fund : अलीकडे गुंतवणुकीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांना वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी बँकेची एफ डी, पोस्ट ऑफिस आणि एलआयसीच्या बचत योजना, पोस्ट ऑफिसची आरडी योजना असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

तसेच शेअर मार्केट आणि म्युचअल फंड यांसारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे. खरे तर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे हे शेअर मार्केटच्या तुलनेत थोडेसे कमी रिस्की आहे. मात्र तरीही शेअर बाजारांशी संलग्न असल्याने या ठिकाणी देखील गुंतवणूकदारांना अभ्यासाअंती गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

म्युच्युअल फंड मध्ये जर योग्य फंडची निवड केली आणि त्यामध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवली तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा म्हणतो. पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.

दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास येथून गुंतवणूकदारांना चांगला परतावा लागतो. दरम्यान आज आपण अशा एका फंडची माहिती पाहणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना 29 वर्षाच्या कालावधीत छप्परफाड रिटर्न दिले आहेत. या फंडने तब्बल दीडशे टक्यांचे रिटर्न दिले आहे.

दहा हजाराच्या एसआयपीने बनवले करोडपती

एचडीएफसी फ्लेक्स कॅप म्युच्युअल फंडने 150% रिटर्न दिले आहेत. हा म्युच्युअल फंड सर्वाधिक जुन्या फंडमध्ये समाविष्ट होतो. या फंडमध्ये 1995 ला ज्या गुंतवणूकदारांनी दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू केली असेल आणि आत्तापर्यंत ही एसआयपी सुरू ठेवलेली असेल तर अशा गुंतवणूकदारांचा 16 कोटी 50 लाख रुपयांचा फंड तयार झालेला असेल.

या 29 वर्षांच्या काळात दहा हजार रुपये एसआयपी करून सदर गुंतवणूकदाराने 34 लाख 80 हजार रुपयांचे गुंतवणूक केलेली असेल. म्हणजेच सदर गुंतवणूकदाराला 16 कोटीहुन अधिक रक्कम या 29 वर्षात रिटर्न म्हणून मिळाली असेल. निश्चितच जेव्हा हा फंड बाजारात दाखल झाला तेव्हापासून गुंतवणूक करणाऱ्यांना या फंडने चांगला परतावा दिलेला आहे. या फंडने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe