IPO 2025: SBI सिक्युरिटीजने केली ‘या’ IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस…बघा यामागील कारणे

Published on -

IPO 2025:- तुम्हाला देखील आयपीओ मध्ये गुंतवणूक करायची असेल व तुम्ही चांगले आयपीओच्या प्रतीक्षेत असाल तर या ठिकाणी दिलेली माहिती ही तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरणार आहे. कारण एसबीआय सिक्युरिटीजने येऊ घातलेल्या एका आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केली आहे व हा आयपीओ असणार आहे गणेश कंजूमर प्रॉडक्टचा होय. कारण या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गणेश कंजूमर प्रोडक्टच्या आयपीओत गुंतवणूकीची शिफारस

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश कंजूमर प्रॉडक्टच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असल्याकारणाने एसबीआय सिक्युरिटीजने यामध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस केलेली आहे. हा आयपीओ 408.80 कोटी रुपयांचा असून 22 सप्टेंबर 2025 रोजी सबस्क्रीप्शनसाठी खुला होणार आहे 24 सप्टेंबरला बंद होईल. महत्वाचे म्हणजे 29 सप्टेंबर 2025 ला हा शेअर बाजारामध्ये लिस्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रे मार्केट प्रीमियम अर्थात जीएमपी मध्ये देखील चांगली वाढ दिसून येत असल्यामुळे गुंतवणूकदारांना संभाव्य लिस्टिंगमध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीचा हा आयपीओ बाजारात आणण्यामागील जर प्रमुख कारण बघितले तर कंपनीला बाजारपेठेमध्ये विस्तार करायचा आहे व त्यामध्ये 42 उत्पादने आणि 232 स्टॉक कीपिंग युनिट्स समावेश असणार आहे. यामध्ये इन्स्टंट मिक्स, मूल्यवर्धित आटा तसेच मसाले व स्थानिक स्नॅक्स या उत्पादनांचा समावेश आहे.

या आयपीओ बाबत एसबीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे की गणेश कंजूमर प्रोडक्ट्स कंपनी पॅकेज्ड आटा आणि गहू उत्पादनासाठी पूर्व भारतामधील तिसरा सर्वात मोठा ब्रँड आहे व इतकेच नाही तर पॅकेज्ड सत्तूमध्ये 43.4% आणि बेसनमध्ये 4.9% बाजारपेठेत असलेल्या पहिल्या दोन कंपन्यांपैकी ही कंपनी एक आहे. इतकेच नाही तर दलिया, रवा आणि मैदा या सेगमेंट मध्ये देखील कंपनी सध्या बाजारपेठेत आघाडीवर दिसून येत आहे. या कंपनीचे नेटवर्क आणि संभाव्य वाढीची मोठी क्षमता असल्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही शिफारस योग्य आहे.

या आयपीओचे स्वरूप कसे?

गणेश कंजूमर प्रॉडक्ट लिमिटेडच्या आयपीओची प्राईस प्रति शेअर 306 ते 322 रुपये असून याची लॉट साईज 46 शेअर्स आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी 14812 रुपये गुंतवावी लागणार आहेत. या इशूमध्ये 130 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी आणि 278 कोटी रुपयांची ऑफर फॉर सेल यांचा समावेश असणार आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe