IREDA Share Price: इरेडाचा शेअर खरेदी करावा का? आली सध्याची टार्गेट प्राईस…. बघा आजचा मार्केट ट्रेंड

Published on -

IREDA Share Price:- आज 20 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी शेअर मार्केटच्या सुरुवातीलाच थोडीशी घसरण झाली व आता त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून सध्या महत्वाचे निर्देशांक बीएसई सेन्सेक्स 51.34 अंकांच्या वाढीसह 81695.73 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी 50 या निर्देशांकात 13.85 अंकांची वाढ दिसून येत आहे व सध्या 24994.90 वर पोहोचला आहे.तसेच निफ्टी बँकमध्ये मात्र 233 अंकांची मोठी घसरण झाली आहे व सध्या 55632.15 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी आयटीत मात्र तब्बल 498.35 अंकांची मोठी वाढ झालेली आहे व सध्या 35255.05 वर व्यवहार करत आहे. या परिस्थितीत मात्र इरेडा म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 0.18 अंकांची काहीशी वाढ झाली असून सध्या हा शेअर 149.09 रुपयांवर ट्रेड करत आहे.

इरेडा शेअरची सध्याची स्थिती

आज अगदी सुरुवातीला इरेडा शेअरची ओपनिंग 149 रुपये किमतीने झाली व सध्या त्यात थोडीशी वाढ दिसून येत असून हा शेअर सध्या 149.09 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच कालची बंद किंमत 149 रुपये इतकी होती व त्या तुलनेत आजची किंमत काहीशी जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच आजची या शेअरची सुरुवातीची कमाल किंमत 150 रुपये तर किमान किंमत 148 रुपये इतकी राहिली आहे व 52 आठवड्यातील कमाल किंमत 266 रुपये आणि किमान किंमत 137 रुपये इतकी राहिली आहे. तज्ञांनी या शेअरसाठी पुढची टार्गेट प्राईस 196 रुपये जाहीर केली आहे.

इरेडा शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा

आतापर्यंत इरेडा शेअरने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा बघितला तर एक वर्ष कालावधीकरिता केलेल्या गुंतवणुकीवर -39.17%, सहा महिने कालावधी करिता -12.54%, तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर -14.56% आणि एक महिन्याच्या गुंतवणुकीवर -5.42% इतका परतावा दिलेला आहे.

इरेडा शेअर होल्डिंग पॅटर्न

इरेडा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर तो खालीलप्रमाणे आहे….

प्रमोटर्सकडे असलेले शेअर 71.76%, म्युच्युअल फंड 0.54%, इन्शुरन्स कंपनी 2.33%, फॉरेन पोर्टफोलिओ इन्वेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार यांच्याकडे 2.04%, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन/ बँका 0.08%, वैयक्तिक गुंतवणूकदारांकडे 21.32% व इतरांकडे 1.93% इतके शेअर्स आहेत. शेअर होल्डिंग पॅटर्नची ही आकडेवारी जून 2025 मधील आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News