Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करणे खरंच फायद्याचे? बघा व्याजदर…

Content Team
Published:
Post Office

Post Office : जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे पोस्ट ऑफिसमध्ये अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस सध्या आपल्या सर्व गुंतवणूक योजनांवर चांगला परतावा ऑफर करत आहे, अशातच गुंतवणूकदारांना आता पूर्वीपेक्षा जास्त फायदा होत आहे, पोस्टात तुम्ही अगदी कमी पैशांची गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता, पोस्टाची अशी एक योजना म्हणजे एफडी. येथे तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता. आणि चांगला निधी गोळा करू शकता.

पोस्ट ऑफिस तुम्हाला एफडीसह आरडीचा देखील पर्याय देते, हे दोन्ही पर्याय बँकेत देखील उपलब्ध आहेत. पण पोस्ट ऑफिस या योजनांवर बँकेपेक्षा चांगले व्याजदर ऑफर करते.

पोस्ट ऑफिस आरडीवर 6.7 टक्के दराने व्याज देत आहे. RD चा फायदा असा आहे की जर तुम्ही एकरकमी मोठ्या रकमेची गुंतवणूक करू शकत नसाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस RD चा पर्याय निवडून दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता.

पोस्ट ऑफिस आरडी 5 वर्षांसाठी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही 5 वर्षानंतर 6.7 टक्के व्याजाने नफा मिळवू शकता. पण पोसटच्या एफडीत तुम्हाला 1 वर्षाच्या गुंतवणुकीवरही इतके व्याज मिळते जे 5 वर्षांच्या आरडीवरही मिळणार नाही. पोस्ट ऑफिस एफडीमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक 1, 2, 3 आणि 5 वर्षांत किती होईल ते आज आपण जाणून घेणार आहोत.

-तुम्ही पोस्ट ऑफिस FD मध्ये एका वर्षासाठी 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 6.9 दराने व्याज दिले जाईल. अशा परिस्थितीत, एक वर्षानंतर तुम्हाला 1 लाख रुपयांवर 7,081 रुपये व्याज मिळेल आणि एक वर्षानंतर एकूण 1,07,081 रुपये परत मिळतील.

-तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 2 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली तर तुम्हाला 7 टक्के दराने व्याज दिले जाईल. अशा परिस्थितीत, दोन वर्षांनी तुम्हाला 14,888 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि तुम्हाला एकूण 1,14,888 रुपये परत मिळतील.

-तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 3 वर्षांसाठी 1 लाखाची FD केल्यास तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल. अशा परिस्थितीत 7.1 टक्के दराने 23,508 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, तीन वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1,23,508 रुपये परत मिळतील.

-पोस्ट ऑफिसमध्ये 1 लाखाची एफडी 5 वर्षांसाठी केली तर तुम्हाला 7.5 टक्के दराने व्याज मिळेल. अशा स्थितीत तुम्हाला 5 वर्षांत गुंतवणुकीवर 44,995 रुपये मिळतील. अशा प्रकारे, 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण 1,44,995 रुपये मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe