ITR Login : दरवर्षी लाखो करदाते कर भरत असतात. जर तुम्ही तो चुकवला तर तुम्हाला दंड भरावा लागतो. यावर्षी आयकर रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 ही होती, जर तुम्ही या मुदतनंतर आयकर भरला तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.
अशा स्थितीत तुम्हाला वेळेपूर्वी हे महत्त्वाचे काम पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. जर तुमचा आयकर रिटर्न भरला असेल तर तो सत्यापित करणेही महत्त्वाचे आहे. समजा तुम्ही तुमचा आयकर सत्यापित केला नाही तर तुमचा ITR फाईल करणे वाया जाईल. अशातच आता काही करदात्यांना दंड भरावा लागणार आहे. इतकेच नाही तर त्यांना दंडाच्या रकमेसह तुरुंगवास भोगावा लागणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

तुम्हीही आयटीआर भरताना केल्यात का या चुका?
हे लक्षात घ्या की, समजा तुम्ही आयकर विभागाने जारी केलेल्या तारखेपूर्वी आयकर रिटर्न भरण्यास सक्षम नसल्यास तर तुम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. देय तारखेपूर्वी आयटीआर भरण्यास चुकतात, त्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे.
तर आकारला जाणार दंड
ज्या करदात्यांना वेळेपूर्वी त्यांचे आयटीआर दाखल करता आला नाही, त्यांना आता कलम 234AF अंतर्गत 5,000 रुपये दंड भरावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नाही तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपये इतकं आहे, त्यांच्याकडून 1,000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतची तारीख निश्चित केलेली आहे.
जावे लागणार तुरुंगात?
तर त्याच वेळी, 31 डिसेंबर 2023 पर्यंत आयटीआर भरणे चुकलेल्या पगारदारांविरुद्ध केंद्र सरकार गुन्हा दाखल करू शकते. सध्या, नियमानुसार, कमीत कमी त्यांना एकूण 6 ते 7 महिन्यांची शिक्षा होण्याची शक्यता आहे. आयटीआर दाखल करत असताना विभाग तुमच्याविरुद्ध सर्व प्रकरणे नोंदवू शकतो, असे नाही. कर चुकवलेली रक्कम 10,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास तरच तुम्ही सुटू शकता.