‘या’ ज्वेलरी कंपनीचा शेअर्स 16 रुपयांवर जाणार ! कंपनीचे अच्छे दिन सुरु होणार

Published on -

Jewellery Share Price : शेअर मार्केट मधून एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. एका बड्या ज्वेलरी कंपनीच्या शेअर्समध्ये पॉझिटिव्ह मुव्हमेंट पाहायला मिळाली आहे. पीसी ज्वेलरीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तीन टक्क्यांची वाढ झाली आणि पुन्हा एकदा या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत.

खरे तर अलीकडेच कंपनीचे सप्टेंबर महिन्याचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात काही सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत. कंपनीवरील कर्ज सुद्धा कमी झाले आहे.

कंपनीचा महसूल पण वाढला आहे. यासोबतच कंपनीबाबत आणखी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. पीसी ज्वेलर्स कंपनीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोलकातास्थित डेब्ट्स रिकवरी अपीलेट ट्रिब्यूनल (DRAT) ने 7 ऑक्टोबरला कंपनी आणि तिच्या कन्सोर्टियम लेंडर्सच्या संयुक्त अर्जाला मंजुरी दिली आहे.

या आदेशानंतर दिल्ली DRAT च्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेल्या चाव्या आणि इन्व्हेंटरी कंपनीकडे परत सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार 9 ऑक्टोबरला करोल बाग आणि नोएडा येथील शोरूममधील सर्व साहित्य आणि चाव्या यशस्वीरित्या पीसी ज्वेलर्सने ताब्यात देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे आता कंपनीचे सर्व शोरूम आणि मालमत्ता पुन्हा पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. आता कंपनीने या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्या सर्व कर्ज नील करण्याचा निश्चय केला आहे. नक्कीच आर्थिक वर्षाच्या शेवटी कंपनी कर्जमुक्त झाली तर गुंतवणूकदारांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान या कंपनीचे स्टॉक शुक्रवारी 13.39 रुपयांच्या इंट्राडे हायवर पोहोचले होते. अशातच आता तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स येत्या काळात 16 रुपयांपर्यंत वाढतील असा अंदाज दिला आहे.

खरेतर, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कंपनीने 577.70 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला असून 2,371.87 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. अलीकडेच कंपनीने दिल्लीतील पीतमपूरा येथे फ्रँचायजी-ओन्ड नवे शोरूम सुद्धा सुरू केले आहे.

सध्या कंपनीचे देशभरात 52 शोरूम कार्यरत आहेत, ज्यापैकी 49 पूर्णपणे स्वतःच्या मालकीचे आहेत. याच सर्व पॉझिटिव गोष्टी पाहता तांत्रिक विश्लेषकांनी कंपनीचा शेअर 13.75 रुपयांवर पोहोचल्यास यात मोठी तेजी येण्याची शक्यता वर्तवली आहे. निकट भविष्यात हा स्टॉक 16 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe