भारतीय OTT बाजारात मोठा बदल झाला आहे! रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांच्यातील भागीदारीनंतर JioCinema आणि Disney+ Hotstar एकत्र आले आहेत, आणि नवीन OTT सेवा “JioHotstar” सुरू करण्यात आली आहे. या विलिनीकरणामुळे JioCinema आणि Disney+ Hotstar च्या वापरकर्त्यांना अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही JioCinema किंवा Disney+ Hotstar चे विद्यमान वापरकर्ते असाल, तर तुमच्या सबस्क्रिप्शन आणि कंटेंटमध्ये काय बदल होणार आहेत? कोणते नवीन प्लॅन उपलब्ध असतील? आणि जुने अॅप्स चालू राहतील का? याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊयात.
JioHotstar म्हणजे काय? JioCinema आणि Disney+ Hotstar एकत्र का झाले?
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने यांनी भारतीय OTT बाजारात आपली ताकद वाढवण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या भागीदारीनंतर, JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे विलीनीकरण करून “JioHotstar” ही एक नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे. याचा मुख्य फायदा असा की, आता तुम्हाला JioCinema आणि Disney+ Hotstar वर वेगळ्या ॲप्समध्ये कंटेंट पाहण्याची गरज नाही. दोन्ही प्लॅटफॉर्मवरील संपूर्ण कंटेंट आता JioHotstar ॲपवर उपलब्ध असेल. या विलीनीकरणामुळे भारतात JioCinema आणि Disney+ Hotstar हे स्वतंत्र OTT प्लॅटफॉर्म म्हणून राहणार नाहीत. त्याऐवजी JioHotstar एकमेव OTT प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahilyanagar-News-32.jpg)
जुन्या युजर्स आणि सबस्क्रिप्शनच काय
जर तुम्ही आधीपासून JioCinema किंवा Disney+ Hotstar चे सदस्य असाल, तर चिंता करण्याची गरज नाही. JioHotstar चे CEO किरण मणी यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याच्या JioCinema आणि Disney+ Hotstar वापरकर्त्यांसाठी काहीही बदलणार नाही. Hotstar वापरकर्त्यांना त्यांच्या विद्यमान प्लॅननुसार कंटेंट पाहता येईल. JioCinema प्रीमियम सदस्यांना स्वयंचलितपणे JioHotstar वर स्थलांतरित केले जाईल. आता फक्त एकाच OTT प्लॅटफॉर्मवर सर्व कंटेंट उपलब्ध असेल, त्यामुळे Jio आणि Hotstar वापरकर्त्यांना दोन वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करावा लागणार नाही.
ioHotstar चे नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन
JioHotstar ने ग्राहकांसाठी तीन वेगवेगळे सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत.
₹149 मोबाइल प्लॅन – हा प्लॅन केवळ मोबाईल वापरकर्त्यांसाठी असेल.
₹299 सुपर प्लॅन – मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी आणि विविध डिव्हाइससाठी हा प्लॅन असेल.
₹349 प्रीमियम प्लॅन – या प्लॅनमध्ये कोणत्याही जाहिराती न दाखवता सर्व कंटेंट पाहता येईल.
भारतातील सर्वात मोठा OTT प्लॅटफॉर्म
JioHotstar हा भारतातील सर्वात मोठा आणि प्रगत OTT प्लॅटफॉर्म बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. Jio आणि Disney+ Hotstar च्या भागीदारीनंतर, भारतीय ग्राहकांसाठी मनोरंजनाचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. एका OTT ॲपमध्ये क्रिकेट, हॉलीवूड ब्लॉकबस्टर, वेब सिरीज आणि प्रीमियम डिजिटल कंटेंट पाहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही आधीपासून JioCinema किंवा Hotstar वापरत असाल, तर तुमच्यासाठी कोणताही मोठा बदल होणार नाही. नवीन ग्राहकांसाठी स्वस्त आणि आकर्षक प्लॅन उपलब्ध आहेत.
कोणता नवीन कंटेंट दिसणार आहे?
JioHotstar च्या माध्यमातून भारतीय प्रेक्षकांना अधिक समृद्ध कंटेंट मिळणार आहे. Hotstar वर पूर्वी उपलब्ध असलेला सर्व कंटेंट आता JioHotstar वर पाहता येईल. NBC Universal, Peacock, Warner Bros., Discovery, HBO आणि Paramount च्या शो आणि चित्रपटांचा अतिरिक्त संग्रहही उपलब्ध असेल. IPL, WPL, ICC इव्हेंट यासह सर्व मोठ्या स्पोर्ट्स इव्हेंट्सचे थेट प्रक्षेपण JioHotstar वर उपलब्ध असेल. Spark नावाचे एक नवीन फीचर लॉन्च करण्यात येईल, ज्यामध्ये भारतातील टॉप डिजिटल क्रिएटर्सचा कंटेंट दाखवला जाईल.