Jio Finance Share Price:- आज 1 ऑगस्ट 2025 असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हाच बीएससी सेन्सेक्समध्ये -0.22% ची घसरण पाहायला मिळाली व या घसरणीसह सेन्सेक्स 81000.20 वर पोहोचला आहे.तर तशीच परिस्थिती स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये देखील दिसून येत आहे. निफ्टीमध्ये देखील -0.24% घसरण झाली असून या घसरणीसह 24698.90 पोहचली आहे.
आज शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी बाजाराच्या सुरुवातीला प्रमुख निर्देशांकाची स्थिती काय?

आज 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी जेव्हा बाजाराची सुरुवात झाली तेव्हा प्रमुख निर्देशांकांची स्थिती बघितली तर निफ्टी मिडकॅप 100 मध्ये देखील -033% टक्क्यांची घसरण दिसून येत आहे व सध्या या घसरणीसह 57210.3 वर पोहोचला आहे तर निफ्टी बँक या प्रमुख निर्देशांकामध्ये देखील -0.26% ची घसरण झाली असून या घसरणीसह सध्या 55815.65 वर ट्रेड करत आहे. महत्वाचे म्हणजे निफ्टी एफएमसीजी या निर्देशांकामध्ये मात्र 1.45 टक्क्यांची सुधारणा दिसून येत असून सध्या 56621.1 वर ट्रेड करत आहे.
1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजीची जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरची स्थिती
आज 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी अगदी बाजाराच्या सुरुवातीला जिओ फायनान्शिअल सर्विसेस शेअरमध्ये सुरुवातीला काहीशी वाढ पाहायला मिळाली.परंतु अगदी काही मिनिटात त्यामध्ये अल्पशी म्हणजेच -0.11% ची घसरण पाहायला मिळाली व सध्या हा शेअर 329.15 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज जेव्हा शेअर बाजारात ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर साधारणपणे 330 रुपयांवर ओपन झाला होता. त्यानंतर मात्र त्यामध्ये काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. काल 31 जुलै 2025 रोजी बाजार बंद होण्याच्या वेळेस हा शेअर 329.25 रुपयांवर ट्रेड करत होता.
गेल्या काही दिवसांपासूनची जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची कामगिरी
आज जर आपण बघितले तर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्स सध्या 326 रुपयांवर ट्रेड करत आहे व ही आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे. तसेच बाजार सुरू झाल्यापासून आतापर्यंतची उच्चांकी पातळी बघितली तर ती 331.30 इतकी राहिली आहे. तसेच या शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी बघितली तर ती 363 रुपये इतकी राहिली तर 52 आठवड्यांची निचांकी पातळी 198.60 इतकी राहिली आहे. तसेच या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 2 लाख 9177.18 रुपये इतके आहे. तसेच आतापर्यंत या शेअर्सने दिलेला परतावा जर बघितला तर गुंतवणूकदारांना तीन महिन्यात +19.17%, सहा महिन्यात +31.74% अशा पद्धतीचा परतावा दिलेला आहे. तसेच YTD रिटर्न देखील +2.90% पर्यंत दिलेले आहेत. आज सध्याच्या परिस्थितीत हा शेअर्स 326 रुपये ते 331.30 च्या दरम्यान ट्रेड करत आहे.