Jio Recharge Plan:- रिलायन्स जिओचा जर भारतातील ग्राहकवर्ग बघितला तर तो काही कोटीत आहे. वोडाफोन-आयडिया तसेच एअरटेल सारख्या टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेमध्ये जर आपण जिओचे रिचार्ज प्लान बघितले तर ते स्वस्त असल्याचे आपल्याला दिसून येते.
काही दिवसांपूर्वी सगळ्या टेलीकॉम कंपन्यांच्या माध्यमातून रिचार्ज प्लानच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आलेली होती व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सगळ्याच कंपन्यांच्या ग्राहकांना यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सध्या बसताना दिसून येत आहे.
जुलै महिन्यामध्ये जिओने देखील रिचार्ज प्लानच्या किंमतींमध्ये वाढ केली होती व त्यामुळे मोठा आर्थिक फटका जिओच्या ग्राहकांना बसला व बरेच ग्राहक हे बीएसएनएल कडे वळताना आपल्याला दिसून आले.
परंतु असे असताना देखील पुन्हा जिओने आता एका रिचार्ज प्लॅनच्या किमतीमध्ये तब्बल शंभर रुपयांची वाढ केलेली आहे व हे दर 23 जानेवारीपासून लागू होणार आहेत.
जिओने ‘या’ सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनच्या किमतीत केली वाढ
जिओचा जर सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन बघितला तर तो 199 रुपयांचा आहे व याच 199 रुपयांच्या प्लॅनच्या किमतीमध्ये आता शंभर रुपयांची वाढ करण्यात आली असून हा प्लान खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता 299 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आता 23 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.
दरवाढीनंतर आता ग्राहकांना काय मिळतील फायदे?
जिओने आता या 299 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनच्या फायद्यांच्या बाबतीत जर बघितलं तर यामध्ये आता वापरकर्त्याला म्हणजेच ग्राहकाला अमर्यादित मोफत कॉलिंग तर मिळणार आहेच.
परंतु दररोज शंभर मोफत एसएमएसचा फायदा देखील मिळणार आहे व मिळणाऱ्या डेटाबद्दल जर बघितले तर ग्राहकाला एकूण यामध्ये तीन जीबी डेटा मिळतो व या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 5G अनलिमिटेड डेटा देखील मिळणार आहे.
हा आहे जिओचा सर्वात स्वस्त फॅमिली प्लान
जिओच्या सर्वात स्वस्त फॅमिली प्लॅनबद्दल जर बघितले तर त्याची किंमत 449 रुपये इतका आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि 5G डेटा आणि ७५ जीबी हायस्पीड डेटा देखील मिळतो. इतकेच नाही तर युजर्स प्राथमिक क्रमांकासह आणखी तीन नंबर याला जोडू शकतात.