Jio चा धमाका! 445 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड 5G डेटा आणि मोफत OTT सबस्क्रीप्शन

Karuna Gaikwad
Published:

Jio OTT Plans:- जर तुम्ही विविध OTT प्लॅटफॉर्मवरच्या वेगवेगळ्या सबस्क्रिप्शनवर जास्त पैसे खर्च न करता प्रीमियम कंटेंटचा आनंद घ्यायचा विचार करत असाल तर JioTV चे OTT सबस्क्रिप्शन प्लॅन्स तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

या प्लॅन्समध्ये तुम्हाला केवळ OTT सबस्क्रिप्शनच नव्हे तर भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसारखे फायदे देखील मिळतात. Jio ने वेगवेगळ्या वापरकर्त्यांसाठी विविध प्लॅन्स उपलब्ध करून दिले आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य प्लॅन निवडू शकता.

Jio चे महत्त्वाचे ओटीटी प्लान्स

Jio ने दोन प्रमुख प्रकारचे OTT प्लॅन्स
आणले आहेत. पहिला प्रकार म्हणजे डेली डेटा ऑफरसह प्लॅन असून ज्यामध्ये तुम्हाला दररोज निश्चित प्रमाणात डेटा मिळतो आणि त्यासोबतच 10 लोकप्रिय OTT सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. दुसरा प्रकार म्हणजे अतिरिक्त डेटा असलेले प्लॅन होय.ज्या मुख्यतः जास्त इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहेत. या प्लॅन्समध्ये अधिक डेटा मिळतो आणि OTT सेवांचे फायदे देखील उपलब्ध असतात.

JioTV 175 रुपयांचा प्लॅन

जर तुम्ही आधीपासूनच Jio चे कोणतेही रिचार्ज प्लॅन वापरत असाल आणि तुम्हाला तुमच्या चालू प्लॅनवर अतिरिक्त डेटा हवा असेल तर 175 रुपयांचा प्लॅन सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 10 जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.जो तुमच्या विद्यमान योजनेसह वापरता येतो. याचा अर्थ असा की, तुम्हाला जुना प्लॅन संपण्याची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही हा अतिरिक्त डेटा कोणत्याही वेळी रिचार्ज करून मिळवू शकता. मात्र लक्षात ठेवा की,या प्लॅनमध्ये केवळ डेटा मिळतो. त्यात कॉलिंग किंवा एसएमएस सुविधा समाविष्ट नाहीत. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. त्यामुळे जास्त डेटा वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

JioTV 445 रुपयांचा प्लॅन

Jio ने 445 रुपयांमध्ये एक प्रीमियम योजना आणली आहे. जी इंटरनेट, कॉलिंग आणि ओटीटी सर्व्हिसेसचा उत्तम मेळ साधते. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो.ज्यामुळे तुम्हाला अखंड इंटरनेट एक्सपिरियन्स मिळतो. यासोबतच सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली जाते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अमर्यादित 5G डेटा होय.त्यामुळे जर तुमच्या भागात Jio 5G सेवा उपलब्ध असेल तर तुम्ही इंटरनेटचा वेग आणि अमर्यादित डेटा याचा पूर्ण फायदा घेऊ शकता.

या प्लॅनमध्ये एकूण 12 ओटीटी सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. त्यामुळे तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे न भरता विविध OTT प्लॅटफॉर्मवरील प्रीमियम कंटेंट पाहता येतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवस आहे. त्यामुळे जर तुम्हाला इंटरनेटसह मनोरंजन हवे असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

JioTV प्रीमियम प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या OTT सेवा

Jio च्या या प्लॅन्समध्ये वेगवेगळ्या प्रीमियम OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते. यामध्ये Sony LIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, Sun NXT, Hoichoi, Planet Marathi, Chaupal, Fancode, Kanchha Lannka आणि JioTV यांसारख्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्रपणे पैसे खर्च करण्याची गरज भासत नाही.

कोणता Jio प्लॅन सर्वाधिक फायदेशीर?

जर तुम्हाला फक्त अतिरिक्त डेटा हवा असेल तर 175 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. मात्र जर तुम्हाला OTT कंटेंटसह डेटा आणि कॉलिंगची सुविधा हवी असेल तर 445 रुपयांचा प्लॅन अधिक फायदेशीर ठरेल. हा प्लॅन प्रीमियम OTT सेवांचे मोफत सबस्क्रिप्शन, भरपूर डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह एकूणच सर्वोत्तम पॅकेज देतो.

ग्राहकांना फायदा

Jio च्या नवीन OTT प्लॅन्समुळे ग्राहकांना कमी किमतीत जास्त फायदे मिळू शकतात. जर तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी OTT सेवांचा जास्त वापर करत असाल तर Jio च्या या प्लॅन्समुळे तुम्हाला वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळी सदस्यता घेण्याची गरज राहणार नाही. याशिवाय इंटरनेट आणि कॉलिंगसाठीही हे प्लॅन्स अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य योजना निवडून Jio च्या प्रीमियम सेवांचा लाभ घेऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe