JP Power Share Price:- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 25% टॅरिफ धोरणाचा परिणाम आज शेअर मार्केटवर दिसून येत आहे की काय अशी परिस्थिती आहे. आज म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 वार शुक्रवारी मार्केटची सुरुवातच मुळात घसरणीसह झाल्याचे दिसून येत असून अजून देखील तीच परिस्थिती आहे. अगदी सध्याची परिस्थिती बघितली तर बीएसई सेन्सेक्समध्ये 166.36 अंकांची घसरण झाली असून या घसरणीसह सेन्सेक्स 81019.22 वर पोहोचला आहे व तीच गत निफ्टीची देखील असून निफ्टी सध्या 58.10 अंकांनी घसरून 24710.25 वर पोहोचली आहे.
या दोन्ही निर्देशांकासह काही महत्त्वाचे निर्देशांक जसे की निफ्टी स्मॉल कॅप निर्देशांकामध्ये देखील 56.30 अंकांची घसरण असून निफ्टी आयटीमध्ये 369.35 अंकांची घसरण दिसून येत आहे. तशीच परिस्थिती निफ्टी बँक निर्देशांकाची असून त्यामध्ये देखील 65 अंकांची घसरण आहे व सध्या या घसरणीसह 55896.95 वर पोहोचले आहे.

1 ऑगस्ट 2025 रोजीची जेपी पावर शेअरची सध्याची स्थिती काय?
ज्याप्रमाणे शेअर बाजार आज घसरणीसह ओपन झाला अगदी त्याच पद्धतीने जेपी पावर शेअरच्या किंमतींमध्ये देखील घसरण दिसून येत आहे. सध्या जेपी पावर शेअर -2.86% घसरणीसह 20.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. काल म्हणजेच 31 जुलै 2025 रोजी मार्केट बंद झाले तेव्हा या शेअरची किंमत 21 रुपये इतकी होती. म्हणजेच कालच्या तुलनेत या किमतीमध्ये -0.6 अंकांची घसरण दिसून येत आहे. तसेच या शेअरची 52 आठवड्याची कामगिरी बघितली तर याची निचांकी पातळी 12 रुपये इतकी राहिली व उच्चांकी पातळी 28 रुपये इतकी राहिलेली आहे. या कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप 13 हजार 981 कोटी रुपये इतके आहे.
आतापर्यंत या शेअर्सने गुंतवणूकदारांना दिलेला परतावा किती?
जर गेल्या एक वर्षापासूनची जेपी पावर शेअरची कामगिरी बघितली तर ती गुंतवणूकदारांसाठी समाधानकारक आहे. गेल्या एक वर्षात गुंतवणूकदारांना या शेअर्सने +2.97%, सहा महिन्याच्या गुंतवणुकीवर +25.17%, तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर +40.58 टक्के तर एक महिन्याच्या गुंतवणुकीवर +11.69 टक्के इतका परतावा दिला आहे. या आकडेवारीवरून दिसून येते की गुंतवणूकदारांसाठी हा शेअर फायद्याचा ठरल्याचे दिसून येत आहे.