मुलीच्या नावावर फक्त एक गुंतवणूक आणि मिळतील 70 लाख रुपये! ही Government Scheme बदलू शकते नशीब

Mahesh Waghmare
Published:

Sukanya Samriddhi Scheme:- राज्य आणि केंद्र सरकार नागरिकांसाठी अनेक योजनांचा लाभ देत असतात. विशेषतः मुलींच्या शिक्षण आणि भविष्यासाठी सरकारकडून काही विशेष योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. ही योजना मुलींच्या भविष्यासाठी मोठी बचत आणि परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे. भारत सरकारच्या बेटी बचाव, बेटी पढाव मोहिमेअंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पालक त्यांच्या १० वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात आणि भविष्यात मोठ्या आर्थिक फायद्याचा लाभ घेऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक आणि परतावा

या योजनेत गुंतवणुकीसाठी किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये दरवर्षी जमा करण्याची सुविधा आहे. खाते उघडल्यापासून 15 वर्षे गुंतवणूक करावी लागते आणि नंतर 21 वर्षांनी ही योजना पूर्णतः परिपक्व (Mature) होते. या योजनेंतर्गत सध्या 8.2% वार्षिक व्याजदर दिला जात आहे.जो अन्य कोणत्याही बचत योजनांच्या तुलनेत अधिक लाभदायक आहे.

जर एखाद्या पालकाने दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवले तर 15 वर्षांत त्यांची एकूण गुंतवणूक 22.5 लाख रुपये होईल. मात्र व्याजाच्या चक्रवाढ स्वरूपामुळे 21 वर्षांनी त्यांना एकूण 69.27 लाख रुपये मिळतील. ज्यामध्ये फक्त व्याजाची रक्कम 46.77 लाख रुपये असेल. हा मोठा परतावा मुलीच्या शिक्षण, उच्च शिक्षण, लग्न किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी उपयोगी ठरू शकतो.

या योजनेच्या मुख्य वैशिष्ट्ये आणि नियम

सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यासाठी 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचे नाव आवश्यक आहे. एका कुटुंबात फक्त दोन मुलींसाठी खाती उघडण्याची परवानगी आहे. परंतु जुळ्या मुली असल्यास तीन खाती उघडता येतात. जर मुलगी 18 वर्षांची झाली असेल आणि लग्न करायचे असेल तर त्या परिस्थितीत खाते पूर्वीच बंद करता येते.

हे खाते पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत उघडता येते. खाते उघडण्यासाठी फक्त मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे ओळखपत्र आणि राहण्याचा पुरावा आवश्यक आहे. या योजनेवर करसवलती देखील मिळतात. कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर करसवलत मिळते.तसेच मिळणाऱ्या व्याजावरही कर लागू होत नाही.

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणुकीचे फायदे

ही योजना मुलींच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. महागाईच्या काळात शिक्षण आणि लग्नाचा खर्च प्रचंड वाढत आहे. त्यामुळे पालकांनी अगोदरपासूनच योग्य नियोजन करून मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही गुंतवणूक करणे आवश्यक आहे. सरकारद्वारे समर्थित असल्यामुळे ही योजना पूर्णतः सुरक्षित आणि हमीदार आहे.

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करा

जर तुम्हाला तुमच्या मुलीचे.शिक्षण, करिअर आणि भविष्याची चिंता असेल तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. वेळ न घालवता जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या मुलीच्या नावाने खाते उघडा आणि भविष्यातील आर्थिक चिंता मिटवा. 70 लाखांहून अधिक परतावा मिळवण्याची ही सुवर्णसंधी सोडू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe