Kalyan Jewellers Share:- शुक्रवारी कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली. बीएसईवर कंपनीच्या शेअर्सने १०% वधारून ४८४.३० रुपयांवर पोहोचला.या वाढीचा मुख्य कारण कंपनीच्या डिसेंबर २०२४ तिमाहीतील उत्कृष्ट आर्थिक निकाल होते. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कल्याण ज्वेलर्सचा नफा २१ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. यावर तज्ज्ञांचे मत आहे की कंपनीच्या शेअर्सची किंमत ६५० रुपयांपर्यंत जाऊ शकते.
ब्रोकरेजने दिले बाय रेटिंग

सिटी ब्रोकरेज हाऊसने कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्ससाठी बाय रेटिंग दिले आहे आणि त्यांना खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तथापि ब्रोकरेज हाऊसने शेअर्सच्या किमतीचे लक्ष्य २० टक्क्यांनी कमी करून ६५० रुपये निश्चित केले आहे. यापूर्वी सिटीने ८१० रुपये लक्ष्य ठेवले होते. कंपनीला डिसेंबर तिमाहीत २१९ कोटी रुपयांचा नफा झाला व त्यामुळे शेअर्समध्ये तीव्र वाढ झाली.
कल्याण ज्वेलर्सचा एकत्रित निव्वळ नफा
२१.१६% वाढून २१८.८२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा १८०.६१ कोटी रुपये होता. डिसेंबर २०२४ मध्ये कंपनीचा महसूल ३९.५१% वाढून ७,२८६.८८ कोटी रुपये झाला.जो गेल्या वर्षी याच कालावधीत ५,२२३.०८ कोटी रुपये होता.
सहा महिन्यातील शेअरची स्थिती
गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ३६% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. या दरम्यान २०२५ च्या सुरूवातीस कंपनीचे शेअर्स ३७% घटले आहेत. तर गेल्या ३ महिन्यांत हे शेअर्स २६% घसरले आहेत. परंतु एक वर्षाच्या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये ३८% वाढ झाल्याचे स्पष्ट आहे.
कल्याण ज्वेलर्सच्या उत्तम तिमाही निकालांनंतरच्या वाढीला अनुकूल वातावरणाचीच मिळालेली पोषक स्थिती मानता येते. जरी काही काळी शेअर्समध्ये घट झाली असली तरी कंपनीच्या मजबूत आर्थिक स्थितीमुळे भविष्यात पुन्हा या शेअर्सच्या किमतीत वृद्धी होण्याची शक्यता आहे.













