बोनस शेअर्सवर डोळा ! या 2 शेअर्सवर होणार जबरदस्त कमाई

Published on -

शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या नजरा दोन खास कंपन्यांकडे वळल्या आहेत कारण साधं आहे, या कंपन्या बोनस शेअर्स देत आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे सध्या या कंपन्यांचे शेअर्स आहेत, त्यांना अतिरिक्त शेअर्स मोफत मिळणार आहेत. आता या बोनसचा फायदा घेण्याची शेवटची संधीही जवळ आली आहे, त्यामुळे बाजारात हालचाली वाढलेल्या दिसत आहेत.

सर्वात आधी बोलूया विम्ता लॅब्सबद्दल. ही कंपनी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये आहे आणि गुंतवणूकदारांना एका शेअरवर एक बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, तुमच्याकडे जर १० शेअर्स असतील, तर तुम्हाला अजून १० मोफत मिळतील. कंपनीने १३ जून ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे.

याच दिवशी एक्स-डेट सुद्धा आहे, म्हणजे त्यानंतर तुम्ही शेअर्स विकत घेतले तरी तुम्हाला बोनसचा फायदा मिळणार नाही. बुधवारच्या व्यवहारात या बातमीचा परिणाम शेअरच्या किंमतीवर स्पष्टपणे दिसून आला शेअर तब्बल ३.६ टक्क्यांनी वाढून ९७४.४ रुपये दरावर बंद झाला.

दुसरी महत्त्वाची कंपनी म्हणजे बजाज फायनान्स. मोठ्या आणि स्थिर कंपन्यांमध्ये गणली जाणारी ही कंपनी यावेळी एकदम उदार वाटली आहे. त्यांनी एका शेअरवर चार बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे.

म्हणजे जर तुमच्याकडे एक शेअर असेल, तर त्याबरोबर अजून चार शेअर्स मोफत मिळतील. ही कंपनी १६ जून २०२५ रोजी रेकॉर्ड डेट ठेवणार आहे. बुधवारीच्या व्यवहारात मात्र या शेअरमध्ये थोडीशी नरमाई पाहायला मिळाली – तो ९४२४ रुपयांवर बंद झाला, म्हणजे सुमारे ०.७६ टक्क्यांची घसरण झाली.

रेकॉर्ड डेट म्हणजे नक्की काय?

हे सगळं वाचताना एक प्रश्न डोक्यात येतोच रेकॉर्ड डेट म्हणजे नक्की काय? तर, एखाद्या कंपनीने जेव्हा बोनस शेअर्स किंवा लाभांश द्यायचा निर्णय घेतला, तेव्हा त्याचा लाभ कोणाला मिळणार हे ठरवण्यासाठी एक विशिष्ट तारीख निश्चित केली जाते, हिलाच रेकॉर्ड डेट म्हणतात. या दिवशी कंपनीच्या रेकॉर्डमध्ये ज्यांचं नाव शेअरहोल्डर म्हणून असेल, त्यांनाच या लाभाचा हक्क मिळतो. त्यामुळे या तारखेआधी शेअर विकत घेणं गरजेचं असतं.

दरम्यान गुरुवारी बाजारात अजून काही हालचाली होण्याची शक्यता आहे कारण त्या बऱ्याच कंपन्या लाभांश देत आहेत, पण या दोन कंपन्यांमुळे बोनससाठी उत्सुकतेचं वातावरण तयार झालं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News