सोने-बिटकॉइन बाजूला ठेवा, चांदी देईल बक्कळ नफा; कुणी दिला सल्ला?

प्रसिद्ध अमेरिकी लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून, भविष्यात तिची किंमत झपाट्याने वाढू शकते, असा महत्वाचा दावा त्यांनी केला आहे. यामागील कारणे देखील लेखकाने सांगितली आहे.

Published on -

Gold and Bitcoin | गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर सोने किंवा बिटकॉइन नव्हे, तर चांदी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो, असा सल्ला दिला आहे रॉबर्ट कियोसाकी यांनी. ‘Rich Dad Poor Dad’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि वित्तीय साक्षरतेचे प्रवर्तक कियोसाकी यांनी पुन्हा एकदा चांदीच्या गुंतवणुकीबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे.

रॉबर्ट कियोसाकींच्या मते, सोने आणि बिटकॉइनचे उत्पादन किंवा पुरवठा काहीसा स्थिर राहतो, परंतु चांदीचा पुरवठा सतत घटतोय आणि त्याचा उद्योगांमधील वापर मोठ्या प्रमाणावर वाढतोय. सौरऊर्जा उपकरणं, इलेक्ट्रिक वाहने, संगणक, संरक्षण तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि पाणीशुद्धीकरण यासारख्या क्षेत्रात चांदीचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चांदीची किंमत भविष्यात झपाट्याने वाढू शकते.

सध्याची किंमत काय?

जागतिक बाजारात चांदी सध्या 29.5 डॉलर प्रति औंस दराने व्यवहारात आहे. मात्र, कियोसाकींचा विश्वास आहे की ही किंमत लवकरच 70 डॉलर प्रति औंस पर्यंत जाऊ शकते. त्यांच्या मते, उद्योगासाठी चांदीची किंमत मुद्दाम कमी ठेवली गेली आहे, पण आता ती बदलण्याची वेळ आली आहे.

भारतामध्ये, सध्या एक किलो चांदी 94,000 रुपयांना उपलब्ध आहे, जी काही दिवसांपूर्वी 99,000 रुपयांवर होती. म्हणजेच, सुमारे 5,000 रुपयांची घसरण झालेली आहे – जी गुंतवणुकीसाठी योग्य संधी ठरू शकते.

रॉबर्ट कियोसाकी यांनी यापूर्वीही डिसेंबर 2024 मध्ये चांदीबाबत आशावाद व्यक्त करत सर्व काही सोडून चांदी खरेदी करण्यास सांगितले होते. त्यावेळीही त्यांनी याच कारणांचा उल्लेख केला होता – वाढती मागणी, मर्यादित पुरवठा आणि तुलनेने स्वस्त किंमत.

का वेगळी आहे चांदी?

सोने हे पारंपरिक आणि विश्वासार्ह गुंतवणूक साधन आहे, पण त्याच्या किंमती आधीच उच्च पातळीवर आहेत. बिटकॉइन हे डिजिटल संपत्तीचे प्रतीक असले तरी त्यातील अस्थिरता आणि सरकारची कठोर धोरणं गुंतवणूकदारांना साशंक बनवतात. चांदी मात्र कमी किंमत, औद्योगिक वापर, आणि उच्च वाढीची शक्यता यामुळे अधिक आकर्षक ठरते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News