Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा मोठा बदल, जाणून घ्या आजचा दर…

Ahmednagarlive24 office
Published:
Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : कुटुंबात कोणताही कार्यक्रम असो…त्यासाठी सर्वजण सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असतात, अशातच जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी 20 फेब्रुवारीची नवीन किंमत पहा.

आज मंगळवारी पुन्हा सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात 100 रुपये किलोची घसरण झाली आहे. नवीन दरांनंतर सोन्याचा भाव 62000 रुपयांच्या पुढे गेला आहे तर चांदीचा भावही 75000 रुपयांच्या वर ओलांडला आहे.

सराफा बाजाराने मंगळवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, 20 फेब्रुवारी रोजी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 57,610 रुपये, 24 कॅरेटचा भाव 62,830 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 47,140 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 75900 रुपये आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत

आज मंगळवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा भाव 57,610/- रुपये, तर मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव 57,460/- वर ट्रेंड करत आहे. तर पुण्यात सोन्याचा भाव 57,450 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत

आज मंगळवारच्या 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोललो तर आज दिल्ली, सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची 62, 830/- रुपये तर मुंबई सराफा बाजारात किंमत 62,680/- रुपये, तर पुण्यात सोन्याचा भाव 63,719 रुपये आहे.

1 किलो चांदीची नवीनतम किंमत

आज मंगळवारी, मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 75,900/- आहे, तर पुण्यात चांदीचा भाव 77,500 रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe