Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर ही योजना 2024 मध्ये सुरू झाली. यासाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ मिळत असून आत्तापर्यंत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना एकूण 16 हप्ते वितरित करण्यात आले आहे.
लाडक्या बहिणींना अलीकडेच सोळावा हप्ता मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू आहे आणि आज उद्याला सर्वच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण नोव्हेबर मध्ये करण्यात आले असून नोव्हेंबर चा हप्ता या महिन्याच्या शेवटी येईल अशी आशा होती. मात्र आता लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागला आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. कालपासून यासाठी आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे. याच आचारसंहितेच्या नियमांनुसार,
कोणताही पक्ष आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना, बैठका, सभा इत्यादी गोष्टी करण्यास अपात्र राहणार आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर असे सर्व मनाई आदेश तात्काळ लागू होत असतात.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तारुढ पक्षांनी विविध कल्याणकारी योजना, सवलतींची घोषणा करून किंवा सार्वजनिक निधीतून मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे शासनाच्या कामगिरीचा ठळकपणे प्रचार केला अन कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला चालना दिली तर याला आचारसंहितेचा नियम भंग समजले जाते.
थोडक्यात आचारसंहिता काळात सरकारला अधिकाराचा दुरुपयोग करता येणार नाही. दरम्यान जर कोणी असा नियम भंग केला तर आचारसंहितेचे नियम भंग झाले आहे असे मानले जाणार आहे.
हेच कारण आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला देखील आता पुढील काही महिने ब्रेक लागणार आहे. ही योजना तात्पुरती स्थगित राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात की पुन्हा एकदा ही योजना सुरळीत सुरू होईल अशी आशा आहे.













