लाडक्या बहिणींना लॉटरी लागली! ‘या’ तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार तीन हजार रुपयांचा आर्थिक लाभ 

Published on -

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अखेरकार आता मुहूर्त सापडला आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर चा हप्ता ऑक्टोबर चा महिना उलटल्यानंतरही खात्यात जमा होत नसल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दुसरीकडे शासनाने केवायसी नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे केवायसीच्या प्रक्रियेमुळे तर हप्ता थांबत नाहीये ना असाही प्रश्न महिलांना पडला आहे. लाडकी बहीण योजनेच्या बाबत बोलायचं झालं तर या अंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

म्हणजेच या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ मिळतोय. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीमधील 15 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे बाब म्हणजे या योजनेचा सोळावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात नेमका कधी वर्ग होणार ? याबाबतही मीडिया रिपोर्टमध्ये मोठा दावा केला जातोय. येत्या काही दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागेल. साहजिकच आचारसंहितेच्या काळात सरकारला लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येणार नाहीत.

यामुळे आता फडणवीस सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकाच वेळी देऊ शकते असा दावा केला जात आहे. अर्थात अद्याप शासनाकडून किंवा शासकीय अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

परंतु विधानसभेच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळेच महायुतीला फायदा झाला होता आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता फडणवीस सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात येत्या काही दिवसांनी वितरित केले जातील असा दावा केला जातोय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. योजनेच्या सुरुवातीला लाडक्या बहिणींना महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात पैसे दिले जात होते.

पण गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे. ऑक्टोबर चा हप्ता देखील महिलांना अजून मिळालेला नाही. मात्र आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News