Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने या योजनेच्या केवायसी प्रक्रिये बाबत नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
जुलै 2024 पासून या योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण 16 हफ्ते वितरित करण्यात आले आहेत. पण आता पुढील काही महिने लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही.

जानेवारी अखेरपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची बातमी समोर येत आहे. नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा लाभ आचारसंहितेमुळे थांबवण्यात येणार आहे. परंतु हे तिन्ही हप्ते आचारसंहिता संपले की एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता सुद्धा आहे.
दुसरीकडे लाडक्या बहिणींना केवायसी ची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून यासाठी सुरुवातीला दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. एक नोव्हेंबर ही केवायसी साठी ची शेवटची मुदत होती. मात्र मुदतीत अनेक लाभार्थी महिलांची केवायसी पूर्ण झाली नाही.
यामुळे महायुती सरकारने केवायसी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांना केवायसीचे आवाहन केले आहे. लाडक्या बहिणींना आता केवायसी साठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
अर्थात केवायसी साठी लाडक्या बहिणीकडे अजूनही 13 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. 28 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत लाडकी बहिणी योजनेच्या केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दरम्यान आता केवायसी साठी 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ मिळाली असल्याने या मुदतीत ज्या महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही त्यांनी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो.
एवढेच नाही तर केवायसी करताना ज्या महिलांचे वडील किंवा पती हयात नसतील त्यांनी त्यांच्या सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार कार्ड जोडण्याची मुभा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.













