Ladaki Bahin Yojana : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये थोडी चिंता आहे.
चिंतेचे कारण म्हणजे आचारसंहिता लागू असल्याने आता पुढील काही महिने लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहेत. खरे तर आचारसंहिता लागू झाली म्हणून लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद पडेल, अशी चर्चा सगळीकडे रंगली होती.

प्रसार माध्यमांमध्ये या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचे चर्चा आहे. वास्तविक आचारसंहिता लागू झाल्यानंतर मंत्री, सरकार किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांना नवीन वित्तीय अनुदान देणे, योजना जाहीर करणे किंवा प्रकल्प सुरू करणे पूर्णपणे प्रतिबंधित असते.
जर समजा आचारसंहितेच्या कालावधीत ही कामे केलीत तर आचारसंहितेचा भंग मानला जातो. आचारसंहितेचा भंग झाल्यानंतर संबंधितांवर कठोर दंड किंवा कारवाई होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुद्धा याबाबत स्पष्ट माहिती देण्यात आली आहे.
यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर नवीन योजना, कल्याणकारी घोषणा किंवा अनुदान थांबवावे लागते असे नमूद आहे. निवडणुक आयोगाला याची पूर्ण कल्पना असते आणि ते काटेकोरपणे याचे पालन करून घेतात. परंतु लाडकी बहिण योजनेशी संबंधित अधिकाऱ्यांनी आचारसंहितेमुळे योजनेवर कोणताच परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे.
म्हणजेच आचारसंहितेच्या कालावधीत सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता मिळत राहणार आहे. अधिकाऱ्यांनी असा युक्तिवाद केला आहे की ही योजना आधीपासूनच सुरू आहे आणि लाभार्थींची यादी सुद्धा निश्चित आहे. यात नवीन लाभार्थी जोडणे आधीच बंद आहे.
यामुळे योजनेच्या विद्यमान लाभार्थींना पैसे देणे चालू राहणार आहे. यावरून आचारसंहिता लाडकी बहीण योजनेसाठी अडथळा ठरणार नसल्याचे स्पष्ट होते. पण लाडकी बहिण योजनेचा लाभार्थ्यांना आता केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
यासाठी 18 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. या मुदतीत केवायसी केल्यास लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार आहेत. परंतु मुदतीत केवायसी झाली नाही तर योजनेतून नाव वगळले जाईल अशी शक्यता आहे. थोडक्यात 18 नोव्हेंबर पर्यंत केवायसी करणाऱ्या लाभार्थ्यांना आचारसंहितेच्या कालावधीत सुद्धा योजनेचा हप्ता मिळत राहणार आहे.
यामुळे लाडक्या बहिणींनी दिलेल्या मुदतीत केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गरज भासल्यास महिलांना केवायसी साठी मुदत वाढ दिली जाणार असे संकेत दिले आहेत. यामुळे आता या प्रक्रियेला सरकार खरच मुदतवाढ देणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहील.