लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता ? समोर आली मोठी अपडेट 

Published on -

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहिणी योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 15 हप्ते मिळाले आहेत आणि लाभार्थ्यांना सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता खर तर ऑक्टोबर मध्येच मिळणे अपेक्षित होते. मात्र ऑक्टोबर मध्ये या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत. ऑक्टोबर मध्ये सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळाला आणि यामुळे आता ऑक्टोबरचा लाभ नोव्हेंबर मध्ये अर्थात या चालू महिन्यात दिला जाणार अशी शक्यता आहे.

विशेष बाब म्हणजे या महिन्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता सुद्धा लागू होणार आहे. यामुळे या महिन्यात ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी ची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून यासाठी दोन महिन्यांची मुदत आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑक्टोबर संपला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले नाहीत.

त्यामुळे महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आधीच या योजनेच्या नियमांमध्ये सतत बदल होतोय. या योजनेतून अपात्र महिलांना वगळण्यासाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच महिलांना केवायसी करताना अडचणी येत आहेत.

दरम्यान, आता लाभार्थी महिला ऑक्टोबर तसेच नोव्हेंबरच्या पैशांची महिला वाट पाहत आहेत. दरम्यान या महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी दिले जातील याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना खरंच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे सोबतच मिळणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News