Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. फडणवीस सरकारने नुकताच महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरु झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे.
म्हणजेच या योजनेतून वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ मिळतोय. आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांना 13 हप्ते देण्यात आले आहेत. जुलै 2024 मध्ये या योजनेचा पहिला हप्ता मिळाला होता.

तेव्हापासून या योजनेतून अविरतपणे पैशांचे वाटप सुरू आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून लाडक्या बहिणींना हप्त्याचे पैसे उशिराने मिळत आहेत आणि यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा दिसते.
जून महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जुलैमध्ये जमा करण्यात आलेत. जुलैचे पैसे ऑगस्टमध्ये जमा झालेत. मागचा हफ्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
तसेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात येईल असा दावा देखील प्रसार माध्यमांमध्ये झाला होता. पण प्रत्यक्षात गणेश विसर्जन झाल्यानंतरही महिलांना लाभ मिळाला नाही.
यामुळे ही योजना बंद झाली की काय अशा अफवा देखील सोशल मीडियामध्ये पसरल्यात. पण आता अखेरकार लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी वितरणाला मान्यता देण्यात आली आहे.
अर्थात आता लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी 48 लाख पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशी माहिती दिली होती.
यानुसार आता सरकारकडून 344 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आधी ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन महिन्यांचे पैसे सोबत मिळतील असा दावा करण्यात आला होता.
पण सरकारने फक्त 344 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याने यावेळी फक्त ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळेल आणि थोड्या दिवसांनी सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळेल अशी माहिती समोर येत आहे.