राज्यातील लाडक्या बहिणींना 100000 रुपयांची मदत मिळणार ! शून्य टक्के व्याजदरात मिळणार कर्ज

Published on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना गेल्या शिंदे सरकारने सुरू केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे याचा पंधरावा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. ऑगस्टचा हप्ता सप्टेंबर मध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता आता ऑक्टोबर मध्ये खात्यात येणार आहे.

दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी ची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. जे लाभार्थी केवायसी करणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.

यामुळे ही योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दम्यान आता या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

या योजनेच्या पात्र महिलांना व्यवसायासाठी आता एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. खरे तर मुंबई व आजूबाजूच्या परिसरात या योजनेच्या लाभार्थ्यांना एक लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

या भागात 3 सप्टेंबर पासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शून्य टक्के व्याज दरात हे कर्ज उपलब्ध करून दिले जात असून मुंबई बँकेने लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केली आहे.

मुंबई बँकेकडून शून्य टक्के व्याजदरात लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. महिलांना व्यवसायासाठी हे कर्ज दिले जात आहे. मुंबई शहर व उपनगरात याची अंमलबजावणी सुरू आहे.

महत्वाची बाब म्हणजे मुंबई बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा पुढे राज्यभर विस्तार होण्याची शक्यता आहे. सरकारकडून राज्यात सगळीकडेच अशा प्रकारची योजना सुरू करण्यात येईल असा दावा केला जात आहे.

नक्कीच लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले तर त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे महिलांना छोटा-मोठा व्यवसाय सुरू करता येणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News