Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका कल्याणकारी योजनेची सुरुवात केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे या नव्या योजनेचे नाव. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच याचा पुढील हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.

ऑगस्टचा हफ्ता सप्टेंबर मध्ये जमा झाला असल्याने सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबर मध्ये जमा होणार अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. खरंतर योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होत होता.
पण आता या योजनेच्या हप्त्याला उशीर होत असून यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिना संपण्यास आता फक्त दोन दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे आणि यामुळे सहाजिकच या महिन्याचा हफ्ता ऑक्टोबर मध्येच मिळणार हे स्पष्ट होत आहे.
दरम्यान आता मीडिया रिपोर्ट्स मध्ये या योजनेचे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे हप्ते एकाच वेळी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील असाही दावा केला जातोय. खरे तर ऑक्टोबर मध्ये दिवाळीचा मोठा सण येणार आहे.
यामुळे सरकार ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर टाकणार नाही. यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांचे पैसे ऑक्टोबर मध्येच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतात. असे झाल्यास या दोन्ही महिन्यांचे पैसे सरकार एकाच दिवशी पात्र महिलांना देऊ शकते.
अद्याप या संदर्भात सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकाच दिवशी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.
यामुळे आता लाडक्या बहिणींना सरकारकडून भाऊबीजेची भेट मिळते का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सरकारने दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केल्यास लाडक्या बहिणींची दिवाळी यंदा मोठ्या थाटामाटात संपन्न होईल.
दरम्यान, लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आता केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.
त्यासाठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे.