लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ! ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट 

Updated on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आले असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.

आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण 15 हप्ते मिळाले आहेत आणि लवकरच या योजनेचा सोळावा हप्ता देखील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र लाभार्थ्यांना मिळाला आहे.

पण या योजनेसाठी सरकारने केवायसीची प्रक्रिया बंधनकारक केली असल्याने लाडक्या बहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. केवायसी साठी सरकारने दोन महिन्यांची मुदत दिली आहे. काही ठिकाणी अडीच महिन्यांची मुदत आहे. पूरस्थितीमुळे काही जिल्ह्यांमध्ये महिलांना पंधरा दिवसांची मुदत वाढून मिळाली आहे.

परंतु सध्या लाडक्या बहिणींना केवायसी करताना OTP एरर सारखे प्रॉब्लेम येत आहेत आणि यामुळे केवायसीची प्रक्रिया वेळेत होणार का हा मोठा सवाल आहे. दरम्यान आज दिवाळी पाडवा साजरा केला जातोय पण अजूनही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर चा हप्ता मिळालेला नाही.

यामुळे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर चा हप्ता नेमका कधी मिळणार हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. अशातच आता राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता बाबत मोठी अपडेट दिली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ते म्हणालेत की परवापासून दिवाळीच्या पर्वाला सुरूवात झाली आहे. आज दिवाळी पाडवा साजरा होत आहे. पाडव्याच्या सर्वांना खूप-खूप शुभेच्छा. नवीन संकल्प, नवीन पर्व सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा असं म्हणत त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच यावेळी त्यांनी लाडक्या बहिणींना देखील लवकरच भाऊबीज मिळणार असे सांगितले आहे. त्यांनी लाडक्या बहिणींना लवकरच भाऊबीज मिळणार. लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असे विधान केले आहे. या विधानावरून आता लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना भाऊबीज निमित्ताने ऑक्टोबर चा हप्ता दिला जाऊ शकतो अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe