Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रतिमाह 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. आतापर्यंत या योजनेत राज्यातून साधारणपणे दोन कोटी 63 लाख पेक्षा जास्त नोंदणी झालेली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीत पडताळणी करण्यात आली व या पडताळणी दिसून आले की अनेक अपात्र असलेल्या लाभार्थ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला व त्यामुळे जे लाभार्थी महिला या अपात्र दिसून आल्या त्यांना या योजनेतून आता वगळण्यात आलेले आहे व ही संख्या आता दोन कोटी 48 लाखांवर आली आहे. अशा या महत्त्वाच्या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे व ती निश्चितच लाडक्या बहिणींसाठी सणासुदीच्या कालावधीत आनंददायी ठरण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणीच्या खात्यात येणार दोन महिन्यांचे पैसे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सप्टेंबर महिन्याची सुरुवात झालेली असताना देखील लाडक्या बहिणींना मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे या कालावधीतच हा हप्ता मिळाला नसल्याने महिला वर्गामध्ये नाराजी दिसून येत आहे.परंतु मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर आता ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये याच महिन्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. परंतु हे दोन्ही हप्ते एकाच तारखेला येणार की वेगवेगळ्या तारखांना याबाबत मात्र अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

याबाबतचा निर्णय साधारणपणे मंगळवारी होण्याची शक्यता असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. या योजनेची आतापर्यंतची पद्धत बघितली तर एखाद्या महिन्याच्या हप्ता जर लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याबाबत घोषणा होते. परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्त्याबाबत सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही व त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही हप्ते जमा केले जाणार असल्याचे संकेत मिळताना दिसून येत आहे व याबाबतचे अधिकृतरित्या घोषणा मंत्री अदिती तटकरे करणार असल्याची देखील माहिती समोर आलेले आहे.