Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका नव्या योजनेची सुरुवात केली. लाडकी बहीण योजना असे याचे नाव. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे. पण ही योजना निवडणुकीच्या घाईगडबडीत सुरू झाली असल्याने सुरुवातीला योजनेच्या निकषांची काटेकोर पडताळणी झाली नाही.
यामुळे आता या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याची उघडकीस आले. हीच बाब लक्षात घेऊन आता शासनाने लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांसाठी केवायसीची प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी याचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे. या जीआर नुसार येत्या दोन महिन्यात महिलांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केवायसी करण्यासाठी फक्त दोन महिन्यांची मुदत असल्याने अनेक महिला केवायसी करत आहेत. परंतु ही प्रक्रिया करताना महिलांना काही अडचणींचा सामना करावा लागतोय. महिलांना केवायसी करताना Error दाखवत आहे.
दरम्यान जर तुम्हालाही असाच प्रॉब्लेम येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी केवायसी करण्याची प्रोसेस नेमकी कशी आहे याची माहिती सांगणार आहोत.
अशा पद्धतीने करा केवायसी
लाडक्या बहिणींना E-KYC करण्यासाठी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर ई केवायसी पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर एक अर्ज ओपन होईल.
यात लाभार्थ्यांना त्यांचा आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) टाकायचा आहे. मग आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन Send OTP या बटणावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. पुढे हा नंबर दिलेल्या रकान्यात भरायचा आहे. यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे तपासले जाईल. केवायसी पूर्ण झाली असेल तर तुम्हाला काहीच करावे लागणार नाही.
पण जर केवायसी पूर्ण झालेली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाणार आहे. यात तुमचा आधार क्रमांक यादीत असेल तर तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक व Captcha टाकावा लागेल.
मग पुन्हा सेंड ओटीपी हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर पुन्हा दिलेल्या रकान्यात हा नंबर टाकायचा आहे. यानंतर मग लाभार्थ्यांना आपली कास्ट कॅटेगिरी निवडायची आहे.
यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म वरील चेक बॉक्सवर टिक करायची आहे. यानंतर तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे. अशा तऱ्हेने तुमची केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल.