Ladki Bahin Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. देवा भाऊंनी आज लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याची योजना जाहीर केली आहे. गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आणि आजतागायत सुरू आहे. अलीकडेच या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

सुरुवातीला प्रत्येक महिन्याचे पैसे महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होत असत. पण आता थोडासा उशीर होतोय. ऑगस्ट महिन्याचा पैसा हा सप्टेंबर मध्ये मिळाला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर चा पैसाही ऑक्टोबर मध्येच येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणा केली आहे.
प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था तयार करण्यात येईल आणि जिल्हा बँकेमार्फत त्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे. शासन लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहिले.
त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवेल असे आश्वासन यावेळी देवा भाऊंनी दिले आहे. राज्यातील सुमारे एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार असा संकल्प देवा भाऊंनी घेतला आहे.
लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी एक लाख रुपयांच्या कर्जातून ते उद्योगधंदे सुरू करतील आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
यातून महिला स्वावलंबी होतील असेही त्यांनी म्हटले आहे. थोडक्यात राज्यातील लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारकडून येत्या काळात बिनव्याजी कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे.
मागे पण याबाबत चर्चा रंगली होती आणि आता दस्तूर खुद्द मुख्यमंत्री साहेबांनीच याबाबत विधान केले आहे. यामुळे लवकरच लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करण्यात येईल आणि जिल्हा बँकेमार्फत त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल अशी आशा आहे.