Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील गोरगरीब गरजू महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 14 हफ्ते वितरित करण्यात आले आहेत. योजनेचा ऑगस्ट महिन्याचा लाभ नुकत्याच काही दिवसांपूर्वी वितरित करण्यात आला आहे.

ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात सप्टेंबर मध्ये जमा करण्यात आला आहे. दरम्यान, या योजनेत सुरू असणारी अनियमितता रोखण्यासाठी सरकारने आता योजनेचे नियम कडक केले आहेत.
सरकारने योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्यांची मुदत सुद्धा देण्यात आली आहे.
यासंदर्भातील शासन निर्णय नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलाय. यामुळे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणीकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींना आधीच योजनेचा लाभ उशिराने मिळतोय आणि आता केवायसीची प्रक्रिया दोन महिने सुरू राहणार असल्याने सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास आणखी विलंब होणार आहे.
यामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांकडून सप्टेंबरच्या हफ्त्याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय. खरे तर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि या आठवड्यात सप्टेंबरच्या हफ्त्याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
पण अद्याप मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. साधारणता महिन्याच्या शेवटी मंत्री तटकरे हत्याबाबत घोषणा करतात पण यावेळी तसे काही घडलेले नाही.
यामुळे सप्टेंबरचा हप्ता लांबणीवर पडणार हे फिक्स आहे. खरे तर हप्ता लांबणीवर पडण्याची ही पहिली वेळ पण नाही. ऑगस्टचा हप्ता सप्टेंबरमध्ये खात्यात आला होता म्हणून आता सप्टेंबरचा हप्ता कदाचित ऑक्टोबर मध्ये खात्यात येऊ शकतो.
मीडिया रिपोर्टनुसार ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात कधीही पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. पण लाडक्या बहिणींची केवायसीची प्रक्रिया सुरू असल्याने हप्ता नेमका किती लांबणीवर पडणार? हे सांगता येणे थोडी कठीण आहे.
तरीही सरकार सप्टेंबरच्या हप्त्याबाबत येत्या काही दिवसांनी अधिकृतरित्या माहिती देईलच. त्यावेळी आपल्याला लाडक्या बहिणींना प्रत्यक्षात सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात योग्य ती माहिती प्राप्त होणार आहे.