Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी एका महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे.
आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत. पहिले दोन हप्ते गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात जमा करण्यात आले होते. यानंतर दर महिन्याला या योजनेचा पैसा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

जुलै 2024 पासून ऑगस्ट 2025 पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात पैसा जमा करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुद्धा करण्यात येत आहे.
या पडताळणीत अनेक महिला अपात्र ठरत आहेत. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे. ऑगस्ट चे पैसे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पात्र महिलांच्या खात्यात जमा होतील अशी शक्यता होती.
मात्र तसे काही घडले नाही ऑगस्ट चा हप्ता सप्टेंबर मध्ये महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे आता सप्टेंबर चा पैसा कधी मिळणार हा सवाल उपस्थित झालाय. दरम्यान याच संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे.
खरे तर येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल. 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सव सुरू होईल. दरम्यान याच नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा लाभ दिला जाणार असल्याचा दावा प्रसारमाध्यमांमध्ये केला जातोय.
अर्थात याबाबत अजूनही सरकारकडून कोणतीच औपचारिक माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्स मध्ये मात्र नवरात्र उत्सवात म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पंधरावा हप्ता दिला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.
नक्कीच जर मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे सप्टेंबरच्या शेवटी लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला तर नवरात्र उत्सव महिलांना मोठ्या थाटामाटात साजरा करता येणार आहे.