Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर आजची ही बातमी तुमच्याच कामाची राहणार आहे. खरे तर सरकारने या योजनेत सुरू असणारी बोगसगिरी नियंत्रणात ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर सरकारने या योजनेची पडताळणी सुरू केली. पडताळणी नंतर अनेक महिला यातून अपात्र झाल्यात.

आता या योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. म्हणजे योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर महिलांना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन महिलांना दोन महिन्यांच्या आत केवायसी पूर्ण करायची आहे.
केवायसी केली नाही तर महिलांचा लाभ बंद होणार असे सांगितले जात आहे. यामुळे सध्या लाडक्या बहिणी केवायसी प्रक्रियेसाठी सीएससी सेंटरवर गर्दी करत आहेत तसेच काही महिला घरीच केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पण लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सरकारने केवायसीसाठी फक्त दोन महिन्यांची मुदत दिली असल्याने लाडक्या बहिणींमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
अनेक महिलांनी केवायसी करताना त्यांना Error येतोय अशी तक्रार केली आहे. खरेतर सरकारने केवायसी केली नाहीतर योजनेतून वगळले जाईल असा इशारा दिला आहे.
यामुळे महिला वर्गात घबराट निर्माण झाली असून सर्व लाभार्थी एकाच वेळी प्रयत्न करत आहेत. यामुळे वेबसाइटवर लोड येत आहे. OTP येण्यास विलंब होतोय. तर काही वेळा साइट क्रॅश सुद्धा होत आहे.
आता यावर उपाय म्हणून सरकारने लाभार्थ्यांना केवायसी केव्हा केली पाहिजे याची वेळ सांगितली आहे. सरकारने लाभार्थ्यांना रात्री 12 वाजल्यानंतर किंवा सकाळी 4 – 5 च्या दरम्यान e-KYC करण्याचा सल्ला दिला आहे.
या वेळेत साइटवरील लोड कमी असल्याने Error ची अडचण येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, सरकारने e-KYC साठी दोन महिन्यांचा कालावधी पण दिला आहे.
त्यामुळे घाई न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरज पडल्यास हा कालावधी वाढवला सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे केवायसीसाठी घाई करू नये.