Ladki Bahin Yojana : महिला सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी गेल्यावर्षी शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय.
या योजनेचा पहिला हप्ता जुलै 2024 मध्ये मिळाला. यानंतर प्रत्येक महिन्याला या योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आले आहेत. आतापर्यंत राज्यातील लाडक्या बहिणींना एकूण 13 हप्ते मिळाले आहेत.

जुलै महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग करण्यात आला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेत. दरम्यान आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
खरंतर अलीकडेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरणाला मंजुरी दिली होती. या हप्त्यासाठी 344 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाली होती.
सरकारकडून निधी वितरणास मंजुरी मिळाल्यानंतर आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठी माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी आजपासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे वर्ग होणार अशी माहिती दिली आहे.
ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार असा सवाल गेल्या अनेक महिन्यांपासून उपस्थित केला जात होता. अखेर कार आज पासून लाडक्या बहिणींना ऑगस्ट चा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याची माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांनी काय सांगितले
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मंत्री तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे.
लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती दिली आहे. थोडक्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात आजपासून पंधराशे रुपयांचा लाभ जमा होणार आहे.
आज राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा होतील. तसेच पुढील तीन-चार दिवसात या योजनेच्या सर्वच लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळून जाईल अशीही माहिती जाणकारांकडून समोर येत आहे.