Ladki Bahin Yojana : गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाडकी बहिणी योजना चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी महायुती सरकारने ही महत्त्वाकांची योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकूण 14 हप्ते मिळाले आहेत.
या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

दरम्यान या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याची बाब उघडकेस आल्यानंतर शासनाने काही कठोर निर्णय घेतल्या आहेत. आता लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.
यासाठी फडणवीस सरकारने महिलांना दोन महिन्यांची मुदत सुद्धा दिली आहे. दोन महिन्यात लाडक्या बहिणीनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान अनेकांच्या माध्यमातून केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हा सवाल उपस्थित केला जातोय. आता आपण केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना कोणकोणती कागदपत्रे लागतील याची माहिती जाणून घेऊयात.
या कागदपत्रांशिवाय केवायसी होणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर केवायसी करावी लागणार आहे. ladakibahin.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर लाभार्थ्यांना केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणींना कोणतीच कागदपत्रे अपलोड करायची नाहीयेत.
यासाठी फक्त लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड, त्यांचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे तो मोबाईल, लाभार्थ्याच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड ज्या मोबाईल नंबरशी लिंक आहे तो मोबाईल लागेल.
सप्टेंबरचा हप्ता कधी जमा होणार?
आतापर्यंत लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंत चे पैसे मिळाले आहेत. ऑगस्ट चा हप्ता सप्टेंबर मध्ये जमा करण्यात आला आहे. यामुळे सप्टेंबर चा पैसा ऑक्टोबर मध्ये मिळणार की काय असा सवाल उपस्थित होतोय.
मीडिया रिपोर्टनुसार सप्टेंबर चे पैसे या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत. याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही पण सप्टेंबरच्या शेवटी किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.