Ladki Bahin Yojana : फडणवीस सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यात वितरित करण्यात आला होता. तसेच आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून हालचाली तीव्र झाल्या आहेत.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहिण योजना चर्चेत आहे. चर्चेचे कारण असे की या योजनेसाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. केवायसीसाठी लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. पण केवायसी करताना महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

OTP एरर च्या समस्येमुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. वेळेवर केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर या योजनेचा हप्ता थांबवला जाईल अशी भीती देखील महिलांना आहे. काही महिला केवायसी झाली नाही तर सप्टेंबरचा हप्ताही मिळणार नाही अशा चिंतेत आहेत.
पण सरकारने सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता केवायसी केली नसेल तरी मिळेल असे संकेत दिले आहेत. अशातच आता सप्टेंबरच्या हप्त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट हाती आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
याचाच अर्थ आता राज्यातील महिलांना लवकरच सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे. येत्या काही दिवसांनी राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये दिले जाऊ शकतात. योजनेच्या हप्त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडे निधी वर्ग करण्यात आला असल्याने दिवाळीच्या आधी राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांची भेट दिली जाऊ शकते.
या योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्याबाबत आज राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या योजनेचे आतापर्यंत एकूण 14 हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
तसेच आता पंधराव्या हप्त्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे आवश्यक निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे लवकरच सप्टेंबरचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. मीडिया रिपोर्ट मध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर तसेच ऑक्टोबर या दोन महिन्यांचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा केले जातील अशा चर्चा सुरू होत्या.
परंतु महिला व बाल विकास विभागाकडे 410 कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्याने यावेळी फक्त सप्टेंबरचाचं हफ्ता दिला जाईल आणि ऑक्टोबरचा हप्ता कदाचित दिवाळीनंतर मिळेल असे चित्र तयार होत आहे.