नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकार (State Government) अशा अनेक योजना राबवत असतात, ज्यामुळे देशातील सामान्य लोकांना आर्थिक आणि सामाजिक मदत होते. त्याचप्रमाणे हरियाणा सरकारकडून (Haryana Government) एक योजना चालवली जात आहे, ज्याद्वारे मुलींना दरवर्षी आर्थिक मदत म्हणून ५००० रुपये दिले जातील.
हरियाणा लाडली योजना (Ladli Yojana) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ अशा लोकांना दिला जातो ज्यांच्या कुटुंबात २ मुली आहेत. यासोबतच या योजनेंतर्गत २० ऑगस्ट २००५ नंतर जन्मलेल्या कोणत्याही मुलीच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजेच या लाभासाठी पात्र असेल.
पैसे कधी आणि कसे मिळवायचे हे जाणून घ्या?
या योजनेअंतर्गत हरियाणा सरकार ‘किसान विकास पत्र’च्या (Kisan Vikas Patra’s) माध्यमातून आर्थिक मदत करणार आहे. म्हणजे तुमची मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला वार्षिक ५००० रुपये दिले जातील.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बीपीएल रेशन कार्ड, मोबाईल क्रमांक, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, पालकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, पालकांचे ओळखपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असेल.
याप्रमाणे अर्ज करा:
तुमच्या घरात दोन मुली असतील आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, शासकीय रुग्णालयात जाऊन अर्ज करू शकता. यासोबतच तुम्ही महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडूनही अर्ज करू शकता.
तुम्ही येथे संपर्क करू शकता:
तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही १८००२२९०९० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.