Large Midcap Stock:- शेअर मार्केट मधून जर तुम्हाला चांगल्या प्रकारचा परतावा मिळवायचा असेल तर गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्याने आणि स्वतः व्यवस्थित अभ्यास करून गुंतवणूक केली तर नक्कीच फायदा होतो. त्यातल्या त्यात संयमाने व सातत्याने जर दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायचे ठरवले व योग्य पद्धतीने शेअरची निवड केली तर शेअर मार्केट मधून मिळणारा परतावा हा नक्कीच फायद्याचा ठरतो.
सध्या जर आपण शेअर मार्केटची स्थिती बघितली तर यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे व अशा परिस्थितीत शेअरची निवड करताना संबंधित कंपनीची सर्व बाजूंनी माहिती घेऊन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. शेअर बाजाराची स्थिती सध्या कशी आहे यापेक्षा संबंधित कंपनीचे मूलभूत घटक बघणे अतिशय महत्त्वाचे असते. या लेखामध्ये आपण स्टॉक रिपोर्ट प्लस च्या 26 सप्टेंबर 2025 च्या अहवालावर आधारित काही स्टॉकची यादी दिलेली आहे. जे लार्ज मिडकॅप स्टॉक असून गुंतवणुकीसाठी ते फायद्याचे ठरू शकतात.

गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे लार्ज मिडकॅप स्टॉक
1- हेल्थकेअर ग्लोबल इंटरप्राईजेस- हा स्टॉक गुंतवणुकीसाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो व हा मिडकॅप स्टॉक असून स्टॉक रिपोर्ट प्लसच्या अहवालामध्ये याला बाय रेटिंग देण्यात आली असून यामध्ये 31 टक्क्यांची संभाव्य वाढ होण्याची शक्यता आहे.
2- माझगाव डॉक शिप बिल्डर्स- हा लार्ज कॅप श्रेणीतील स्टॉक असून याकरिता या अहवालात होल्ड रेटिंग देण्यात आलेली आहे व 32 टक्के यामध्ये संभाव्य वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
3- टाटा कम्युनिकेशन- हा लार्ज कॅप श्रेणीतील स्टॉक असून या रिपोर्टमध्ये या स्टॉक करिता बाय रेटिंग देण्यात आलेली असून या शेअरच्या किमतीत 33 टक्क्यांची संभाव्य वाढ अपेक्षित आहे.
4- भारत इलेक्ट्रॉनिक्स- हा लार्ज कॅप श्रेणीतील स्टॉक असून यासाठी बाय रेटिंग देण्यात आलेली आहे व यामध्ये येणाऱ्या काळात 36 टक्के संभाव्य वाढ होऊ शकते.
5- ग्रॅफाइट इंडिया- हा मिडकॅप श्रेणीतील स्टॉक असून याकरिता स्ट्रॉंग बाय रेटिंग देण्यात आलेली आहे. यामध्ये येणाऱ्या काळात 34% संभाव्य वाढ अपेक्षित आहे.