Business Idea News : जर तुम्हीही नोकरी सोबत अतिरिक्त कमाई करू इच्छित असाल आणि व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूपच राहणार आहे. खरंतर अलीकडे वाढत्या महागाईमुळे नोकरदार मंडळीला महिन्याकाठी हाती येणारा पगार पुरत नाहीये. यामुळे नोकरी सोबतच एखादा व्यवसाय सुरू करावा असे स्वप्न अनेक जण पाहू लागले आहेत.
जर तुम्हीही असेच स्वप्न पाहिलेले असेल आणि व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला एका भन्नाट बिजनेस आयडियाची माहिती देणार आहोत. आज आपण अशा एका व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकणार आहे.

हा बिजनेस सुरु करून तुम्ही अवघ्या एका वर्षाच्या काळात करोडो रुपयांची उलाढाल करू शकणार आहात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या व्यवसायाविषयी सविस्तर माहिती.
कोणता आहे तो व्यवसाय
अलीकडे बाजारात हर्बल प्रोडक्टची मागणी वाढली आहे. आयुर्वेदिक उत्पादनाची वाढती मागणी पाहता आता वेगवेगळ्या कंपन्या आयुर्वेदिक उत्पादने तयार करत आहेत. जर तुम्हालाही एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आयुर्वेदिक उत्पादने तयार करू शकता.
अलीकडे बाजारात वेगवेगळ्या आयुर्वेदिक तेलाची मागणी वाढली आहे. यामध्ये जर्दाळू तेलाची देखील मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणून आज आपण जर्दाळू तेल बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा याबाबत जाणून घेणार आहोत.
खरे तर बाजारात ऍप्रीकोट ओईल अर्थातच जर्दाळू तेलाची मोठी मागणी आहे. शिवाय याला बाजारात चांगला दरही मिळत आहे. यामुळे तुम्ही या संधीचे सोने करून अप्रिकॉट ऑइल मेकिंग बिझनेस सुरू केला तर तुम्हाला चांगली कमाई होणार आहे.
कुठं वापरलं जात जर्दाळू तेल
जर्दाळू तेल म्हणजेच जर्दाळू कर्नल तेल हे एक अतिशय हलके तेल असते. या तेलामध्ये असणारे भन्नाट औषधी गुणधर्म पाहता याला बाजारात मोठी मागणी आहे. हे तेल जर्दाळूच्या बियापासून बनवले जाते. आपल्या देशात या तेलाचा वापर हेअर ऑइल म्हणून तसेच मसाज करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. तर काही देशांमध्ये या तेलाचा वापर स्वयंपाकात केला जातो.
या तेलाचा वापर करून अनेक देशांमध्ये भाजी बनवली जाते. याशिवाय इतरही अनेक खाद्यपदार्थांमध्ये या तेलाचा वापर होतो. कॉस्मेटिक उत्पादने बनवण्यासाठीही या तेलाची मागणी आहे. अशा परिस्थितीत या तेलाला बाजारात चांगला भाव मिळत आहे.
किती गुंतवणूक करावी लागेल
जर्दाळू तेल तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला मोठी गुंतवणूक मात्र करावी लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास 11 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. तुमच्याकडे जर स्वतःची जागा असेल तर तुम्ही त्या जागेत शेड तयार करून जर्दाळू तेल मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करू शकता.
जर तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्हाला भाड्याने जागा घ्यावी लागेल आणि यासाठी शेड तयार करावे लागणार आहे. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला पाच लाख रुपये खर्च करून मशीन खरेदी करावी लागणार आहे. याशिवाय तुम्हाला फर्निचर आणि इतर गरजेच्या कामासाठी दीड लाख रुपये गुंतवावे लागतील. तसेच खेळते भांडवल म्हणून तुम्हाला साडेचार लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते.
किती कमाई होणार
जर्दाळू तेलाला बाजारात मोठी मागणी आहे. यामुळे या व्यवसायातून महिन्याकाठी साठ ते सत्तर हजाराची कमाई होऊ शकणार आहे. वार्षिक आधारावर पाहिले तर तुम्हाला सात लाख वीस हजारापासून ते आठ लाख 40 हजारापर्यंत ची कमाई या व्यवसायातून होऊ शकणार आहे.
मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात योग्य पद्धतीने करावी लागणार आहे. जर तुम्ही चांगली जाहिरात केली तर तुमच्या प्रॉडक्टचा खप वाढेल आणि यामुळे साहजिकच तुमचं उत्पन्न वाढणार आहे.