LIC Dhan Vridhhi : LIC ची ‘ही’ लोकप्रिय योजना लवकरच होणार बंद, गुंतवणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक !

LIC Dhan Vridhhi

LIC Dhan Vridhhi : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन योजना आणत असते, अशातच LIC ची एक लोकप्रिय योजना काही दिवसात बंद होणार आहे. अशातच तुम्ही ही योजना खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यकडे फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत.

LIC ची एकल प्रीमियम जीवन विमा योजना धन वृद्धी 30 सप्टेंबर 2023 रोजी संपेल. LIC धन वृद्धी पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड, गैर-सहभागी, वैयक्तिक बचत, सिंगल प्रीमियम लाइफ प्लॅन आहे, जी गुंतवणूकदारांना जीवन संरक्षण आणि बचत फायदे प्रदान करते. याशिवाय, गुंतवणूकदार कधीही योजनेतून बाहेर पडू शकतात किंवा या योजनेवर कर्ज घेण्यासह 80C कर सूटचा लाभ देखील घेऊ शकतात.

राष्ट्रीय विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने आपल्या ग्राहकांना हो योजना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत खरेदी करण्यास सांगितले आहे. कारण ही योजना खरेदी करण्यासाठी फक्त ५ दिवसच उरले आहेत. एलआयसीची धन वृद्धी ही सुरक्षा आणि बचत यांचे मिश्रण आहे. धन वृद्धी योजना पॉलिसी कालावधी दरम्यान विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक सहाय्य प्रदान करते. हे विमाधारक व्यक्तीला मुदतपूर्तीच्या तारखेला हमी एकरकमी रक्कम देखील प्रदान करते. एलआयसीने सांगितले की, ही योजना निवडण्यासाठी दोन पर्याय आहेत, ज्यामध्ये मृत्यूवरील विमा रक्कम एकतर 1.25 पट किंवा दुसऱ्या पर्यायामध्ये 10 पट असू शकते.

LIC धन वृद्धी योजनेचे फायदे :-

LIC धन वृद्धी योजना 10, 15 आणि 18 वर्षांसाठी उपलब्ध आहे आणि प्रवेशाच्या वेळी ग्राहकाचे किमान वय 90 दिवस ते 8 वर्षे असावे. तर, योजनेत प्रवेशासाठी कमाल वय 32 ते 60 वर्षे कालावधी आणि पर्यायानुसार आहे. या योजनेचे गुंतवणूकदार ते कधीही सरेंडर करू शकतात आणि 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सूट देखील मिळवू शकतात.

धन वृद्धी योजनेअंतर्गत, परिपक्वता किंवा मृत्यूनंतर पाच वर्षांसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अंतराने सेटलमेंट पर्याय प्रदान केला जाईल.
एलआयसी धन वृद्धी योजनेचे गुंतवणूकदार पॉलिसीचे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe