LIC Jeevan Shanti Yojana : सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. सरकार देखील बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. ज्यामध्ये बचतीवर चांगला परतावा मिळतो. दरम्यान एलआयसीद्वारे देखील अनेक योजना राबवल्या जातात, ज्या तुमच्या भविष्याच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. आज आपण एलआयसीच्या अशाच एका खास पॉलिसीबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही पेन्शन स्वरूपात चांगला नफा कमावू शकता.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने नुकतीच (LIC) LIC जीवन शांती योजना सुरू केली आहे. LIC ची ही नवीन जीवन शांती योजना 2023, तुमच्यासाठी उत्तम योजना असू शकते. विशेषत: पेन्शनसाठी तयार करण्यात आलेल्या एलआयसीच्या या योजनेची सर्वात चांगली गोष्ट ही आहे. यामध्ये पैसे फक्त एकदाच जमा करावे लागतात आणि निवृत्तीनंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळते. यामध्ये एकरकमी पैसे गुंतवून तुम्ही म्हातारपणाच्या चिंतेपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकता.

या योजनेत तुम्हाला दरवर्षी 50, हजार पेन्शन दिली जाणार आहे. कंपनीने या पॉलिसीला जीवन शांती असे नाव दिले आहे. कंपनीने सांगितले की, एकदा पैसे गुंतवून तुम्ही आयुष्यभर शांततेने जगू शकता. पॉलिसीनुसार, 5 लाख रुपये गुंतवणाऱ्यांना दरवर्षी 50,000 रुपये पेन्शन दिले जाईल. एलआयसीच्या या नवीन जीवन शांती योजनेचा प्लॅन क्रमांक 858 आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सर्व पेन्शन योजनांमध्ये नवीन जीवन शांती योजना देखील समाविष्ट आहे. ही योजना तुम्हाला निवृत्तीनंतर आजीवन पेन्शनची हमी देते. LIC ची ही नवीन जीवन शांती योजना एक वार्षिक योजना आहे. त्यानंतर 1 ते 5 वर्षांचा लॉक कालावधी असतो.
या योजनेंतर्गत वयोमर्यादा 30 ते 80 वर्षे दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. या वयोगटातील कोणीही हा प्लॅन खरेदी करू शकतो. तुम्ही हा प्लान दोन पर्यायांमध्ये खरेदी करू शकता. पहिले एकल जीवन स्थगित वार्षिकी आहे तर दुसरे संयुक्त जीवन स्थगित वार्षिकी.
त्यानंतर 1 ते 5 वर्षांचा लॉक पीरियड असतो, तो घेताना तुमची पेन्शनही निश्चित होते. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला समान पेन्शन दिली जाते. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर 1 ते 5 वर्षांचा लॉक कालावधी असतो. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला निश्चित पेन्शन दिली जाते.
काही कारणास्तव नोकरीत मुदतपूर्व निवृत्ती घ्यावी लागली, तर अशा स्थितीत उत्पन्नाचा स्रोत पूर्णपणे संपतो. हा प्रकार लक्षात घेऊन एलआयसीची नवीन जीवन शांती योजना तयार करण्यात आली आहे.
ही पूर्णपणे डीफॉल्ट अॅन्युइटी योजना आहे. पेन्शन घेताना त्याची रक्कम निश्चित होते. तुम्हाला किमान एक वर्षाच्या नियमित अंतराने मासिक पेन्शन दिली जाते. ही योजना घेण्यासाठी किमान दीड लाख रुपयांची गुंतवणूक करणे बंधनकारक असले तरी जीवन शांती योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.