LIC New Jeevan Shanti Scheme : 5 लाख जमा करून दरवर्षी मिळवा 50 हजारांपर्यंत पेन्शन, बघा खास प्लॅन !

Sonali Shelar
Published:
LIC New Jeevan Shanti Scheme

LIC New Jeevan Shanti Scheme : वयाची 40-50 वर्षे ओलांडल्यानंतर वृद्धत्वाची चिंता सर्वांना सतावते, अशा स्थितीत भविष्याची योजना आखणे फार महत्वाचे ठरते. खास करून नोकरदार व्यक्तीने लवकरात लवकर निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे. दरम्यान, तुमच्या माहितीसाठी, भारतीय आयुर्विमा महामंडळाची नवीन जीवन शांती सेवानिवृत्ती योजना खूप लोकप्रिय आहे.

पेन्शनसाठी खास तयार केलेल्या एलआयसीच्या या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला एकदाच रक्कम जमा करावी लागते आणि तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. एलआयसीच्या या नवीन जीवन शांती योजनेचा प्लॅन क्रमांक 858 आहे. या योजनेची खास वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-

काही वेळेला नोकरीतून मुदतपूर्व निवृत्ती घ्यावी लागते, अशावेळी उत्पन्नाचा स्रोत संपतो आणि सतावते ती म्हणजे भविष्याची चिंता. हा सर्व प्रकार लक्षात घेता एलआयसीने ही नवीन जीवन शांती योजना तयार केली आहे. ही एक स्थगित Annuity योजना आहे, जी तुम्ही घेताना पेन्शनची रक्कम निश्चित करू शकता. किमान एक वर्षाच्या नियमित अंतरानंतर, तुम्हाला दरमहा पेन्शन मिळू लागते.

LIC नवीन जीवन शांती योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :-

-ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे, याचा अर्थ तुम्हाला येथे फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागणार आहे.
-येथे गुंतवणूक केल्यानंतर 1 ते 12 वर्षांच्या कालावधीनंतर पेन्शन मिळण्याचा पर्याय आहे,
-वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक पेन्शन रक्कम प्राप्त करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
-10 लाखांच्या गुंतवणुकीवर 11000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन उपलब्ध आहे.
-या योजनेत 6.81 ते 14.62% व्याज मिळते.
-एकल जीवन आणि संयुक्त जीवन दोन्हीमध्ये पेन्शन मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कोण येथे गुंतवणूक करू शकतो?

येथे 30 ते 79 वर्षे वयोगटातील कोणीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. विशेष बाब म्हणजे ही योजना तुम्ही कधीही सरेंडर करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. या कालावधीत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या खात्यात जमा केलेली रक्कम आणि काही अतिरिक्त रक्कम नॉमिनीला दिली जाते. लक्षात असुद्या या प्लॅनमध्ये कोणताही रिस्क कव्हर नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe