LIC Pension Plan : देशातील सगळ्यात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडे म्हणजेच LIC कडे प्रत्येक वयोगटासाठी पॉलिसी उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक योजना अतिशय लोकप्रिय असून ज्या सर्वात सुरक्षित गुंतवणूक आणि गुंतवणुकीच्या रकमेवर सर्वात जास्त परतावा देतात.
अशीच एक एलआयसीची योजना आहे. जी तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शनची हमी देते. विशेष म्हणजे यात तुम्हाला फक्त 72 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला या योजनेत पेन्शन मिळू लागते. या योजनेचे नाव आहे जीवन निधी योजना. दरम्यान, काय आहे एलआयसीची ही शानदार योजना? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
जाणून घ्या एलआयसीची संपूर्ण योजना
सर्वात महत्त्वाचे म्हणजे LIC जीवन निधी पॉलिसी ही देशातील प्रसिद्ध पेन्शन योजनांपैकी एक योजना आहे. परंतु या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की एलआयसीची ही योजना अशा लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांचे उत्पन्न खूप कमी आहे. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदारांना दररोज 72 रुपये गुंतवणुकीवर निवृत्तीनंतर 25 हजार रुपयांहून अधिक मासिक पेन्शनचा लाभ मिळतो.
जाणून घ्या पात्रता
एलआयसीच्या या योजनेमध्ये 20 ते 58 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्तीला गुंतवणूक करता येते. तसेच या योजनेंतर्गत पेन्शनसोबतच विमा योजनेचाही लाभ गुंतवणूकदारांना घेता येईल. त्याशिवाय प्रत्येक वर्षी 6 वर्षांच्या बोनसचीही हमी गुंतवणूकदारांना देण्यात आली आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे या योजनेच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलत मिळेल.
संपूर्ण गणना
एलआयसीच्या या योजनेचा कालावधी 7 वर्षे ते 35 वर्षांचा आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना पेमेंटसाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही, वार्षिक पेमेंटचा पर्याय निवडता येतो. या योजनेअंतर्गत, समजा एखादा गुंतवणूकदार 20 वर्षांच्या वयात पॉलिसी अंतर्गत 25 वर्षांसाठी प्रत्येक दिवशी 72 रुपये गुंतवू शकतो, तर त्याला 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो. यासोबतच निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभही त्याला मिळतो. जर तुम्हाला या योजनेशी संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही एलआयसीच्या जवळच्या शाखेतून किंवा अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता.