LIC Policy:- आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींनी एलआयसी म्हणजे जीवन विमा महामंडळाच्या माध्यमातून एखादी पॉलिसी घेतलेली असते व या पॉलिसीचा नियमितपणे प्रीमियम देखील भरला जात असतो. परंतु काही अनपेक्षित घटना किंवा कारणांमुळे आपल्याला वेळेवर प्रीमियम भरणे शक्य होत नाही व त्यामुळे घेतलेली पॉलिसी बंद पडते व त्यामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसू शकतो. जर आपण अशाप्रकारे पॉलिसी लॅप्स म्हणजेच बंद पडलेल्या पॉलिसीधारकांची संख्या पाहिली तर ती खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येईल. परंतु आता अशा पॉलिसीधारकांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी व आनंदाची बातमी असून बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे याकरिता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसीच्या माध्यमातून विशेष असे रिव्हायवल कॅम्पेन म्हणजेच पुनरुज्जीवन मोहीम सुरू केली आहे व 18 ऑगस्ट ते 17 ऑक्टोबर 2025 दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे.
या मोहिमेचा पॉलिसीधारकांना कसा होईल फायदा?
ही विशेष प्रकारची मोहीम एलआयसीने सुरू केली असून काही कारणामुळे ज्यांचे प्रीमियम भरले गेले नाहीत व पॉलिसी बंद पडली आहे अशा पॉलिसीधारकांना विलंब शुल्कावर खूप मोठ्या सवलती दिल्या जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून ज्या पॉलिसांना नॉन- लिंक्ड पॉलिसींना लागू होणार आहे. यामध्ये विलंब शुल्कावर 30% पर्यंत आणि कमाल 5000 पर्यंत सूट दिली जाणार आहे. परंतु यामध्ये मायक्रो इन्शुरन्स पॉलिसीकरिता लेट फी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या लोकांचे उत्पन्न खूप कमी आहे अशा लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे व त्यांच्या कुटुंबांना परत विमा संरक्षण मिळवण्यास मदत होणार आहे.

या योजनेसाठीचे पात्रता काय?
या मोहिमेत अशा योजनेचा समावेश करण्यात आला आहे त्यांचा प्रीमियम भरण्याची मुदत अजून चालू असून एकूण पॉलिसी संपण्याची मुदत पूर्ण केलेली नाही अशा सर्व वैयक्तिक, नॉन लिंक्ड पॉलिसी पात्र ठरणार आहेत. पॉलिसीचा पहिला न भरलेला प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षाच्या आत ती पुन्हा सुरू करता येणार आहे. या मोहिमेअंतर्गत कुठल्याही प्रकारची वैद्यकीय किंवा आरोग्य तपासणीच्या नियमांमध्ये सवलत मिळणार नाही. आवश्यक असेल तेव्हा पॉलिसीधारकांना वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे राहील.
लेट फी म्हणजेच विलंब शुल्कावर कशी मिळेल सवलत?
1 लाख रुपयांच्या थकीत प्रीमियम असेल तर 3 हजार रुपये, एक लाख एक हजार ते 3 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियम करिता चार हजार रुपये मर्यादेपर्यंत सवलत मिळणे शक्य आहे. तसेच 3 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असेल तर 30 टक्के किंवा 5 हजार रुपयापर्यंत सूट मिळू शकते.परंतु मायक्रो इन्शुरन्स पॉलिसी करिता मात्र 100 टक्के विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे.