LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कपंनी आहे. अशा परिस्थितीत तुम्ही सुरक्षित गुंतवणुकीची योजना आखत असाल तर तुम्ही LIC योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा योजना आणते. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत येथे सर्वांसाठी योजना आहेत.
LIC च्या योजनांमध्ये तुम्ही सहज गुंतवणूक करू शकता. तसेच यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील दिला जातो. आज आम्ही तुम्हाला LIC ची खास महिलांसाठी तयार केलेल्या योजनेबद्दल सांगणार आहोत.

या योजनेत गुंतवणूक करून महिला आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. याशिवाय या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त महिलाच गुंतवणूक करू शकतात. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणुकीसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. यात 8 वर्षांच्या मुलीपासून 55 वर्षांच्या महिलेपर्यंत सर्वांचा समावेश आहे. यामध्ये किमान विमा संरक्षण 75,000 रुपये आहे. तुम्ही कमाल 3 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिल्या 5 वर्षांत झाला तर या पॉलिसीची रक्कम नॉमिनीला दिली जाते.
पॉलिसीधारकाचा 5 वर्षांनंतर मृत्यू झाल्यास, नॉमिनीला मृत्युदर जोडला जातो. जर तुम्ही या पॉलिसीमध्ये 15 वर्षांसाठी दररोज 51 रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 3 लाख 60 हजार रुपये मिळतील.
उदाहरणार्थ, जर 55 वर्षांच्या महिलेच्या पालकाने 15 वर्षांची मुदत योजना आणि 3 लाख रुपयांचा विमा पर्याय निवडला तर तिला 15 वर्षांसाठी दररोज 51 रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे त्यांना एकूण 2 लाख 77 हजार 141 रुपये भरावे लागणार आहेत. मॅच्युरिटीवर ही रक्कम 3 लाख 60 हजार रुपये असेल.













