LIC Scheme:- मुलांचे शिक्षण आणि त्यांचे लग्नकार्य किंवा इतर गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता असते व त्याचे नियोजन आतापासूनच करून ठेवण्यासाठी पालक प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येतात. याकरिता अनेक प्रकारच्या योजनांचा आधार घेतला जातो व अशा योजनांमध्ये गुंतवणूक करून शिक्षण किंवा लग्नकार्य तसेच इतर गोष्टींसाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. याकरिता अनेक वेगवेगळ्या पर्याय सध्या उपलब्ध असल्याचे दिसते. या पद्धतीने तुम्हाला देखील तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तरतूद करायची असेल तर याकरिता एलआयसीचे जीवन तरुण पॉलिसी तुमच्याकरिता खूप फायदा देणारे ठरू शकते. ही पॉलिसी फक्त मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत करत नाही तर त्यांचे आर्थिक दृष्ट्या भविष्य सुरक्षित करण्यास देखील मदत करते. चला तर मग आपण या लेखात एलआयसीच्या जिवन तरुण पॉलिसी बद्दलची थोडक्यात माहिती बघू.
एलआयसीच्या जीवन तरुण पॉलिसीचे वैशिष्ट्ये
मुलांना चांगले शिक्षण मिळावे व त्यांनी आयुष्यामध्ये आर्थिकदृष्ट्या समृद्ध राहावे हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. अशाच प्रकारचे तुमचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याचे काम एलआयसीची जीवन तरुण पॉलिसी करू शकते. मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ही पॉलिसी मदत करतेस परंतु त्यांना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित देखील करते. ही पॉलिसी मुळात मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली आहे. त्या छोट्याशा गुंतवणुकीतून मोठा निधी निर्माण करण्याची संधी या माध्यमातून निर्माण होते. तुम्ही फक्त 150 रुपये दररोज जमा करून आणि याप्रमाणे महिन्याला चार हजार पाचशे रुपये गुंतवून तुमच्या मुलांसाठी 26 लाख रुपयांचा निधी या माध्यमातून तयार करू शकतात. हा निधी मुलांचे उच्च शिक्षण तसेच करियर व इतर महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. ही पॉलिसी मर्यादित प्रीमियम पेमेंट योजना असली तरी देखील यामध्ये गुंतवणुकीसह विमा संरक्षणाचा लाभ देखील मिळू शकतो. प्राप्त माहितीनुसार या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारक एका निश्चित कालावधी करिता विम्याचे हप्ते भरतो आणि मूल जेव्हा पंचवीस वर्षाचे होते तेव्हा एकरकमी रक्कम यातून काढता येते. तुम्ही जर एलआयसीच्या जिवन तरुण पॉलिसीमध्ये महिन्याला साडेचार हजार रुपये आणि वर्षाला 54 हजार रुपये इतकी गुंतवणूक केली आणि ही पॉलिसी मुलाच्या एक वर्ष वयात सुरू केली व 25 वर्षे सुरू ठेवली तर या पॉलिसीच्या मॅच्युरिटी वेळी 26 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो. यामध्ये विमाचे रक्कम तसेच वार्षिक बोनस आणि अंतिम अतिरिक्त बोनस समाविष्ट असू शकतो.

कुणाला घेता येतो या योजनेचा लाभ?
एलआयसीच्या जिवन तरुण पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर मुलाचं किमान वय 90 दिवस आणि जास्तीत जास्त बारा वर्षे असणे गरजेचे आहे. परंतु मूल जर बारा वर्षापेक्षा मोठे असेल तर या योजनेचा लाभ त्याला मिळत नाही. या पॉलिसीचा एकूण कालावधी मुलाच्या सध्याच्या वयाच्या आधारावर ठरवला जातो. म्हणजे मूल जर पाच वर्षाच्या असेल तर पॉलिसीचा कालावधी वीस वर्ष असतो. तसेच या योजनेमध्ये तुम्हाला मॅच्युरिटी वरच नाही तर मध्यंतरी देखील पैसे काढता येतात. तसेच मुल चोवीस वर्षाचे होईपर्यंत दरवर्षी मनी बॅकच्या रूपात एक निश्चित रक्कम परत मिळू शकते. त्यानंतर 25 व्या वर्षी पॉलिसीची संपूर्ण मॅच्युरिटी रक्कम एकत्रितपणे मिळते.